IPL 2022 Mumbai Indians vs Punjab Kings  Sakal
IPL

MI vs PBKS : मुंबईचं पुन्हा ये रे माझ्या मागल्या; Highlights

सकाळ डिजिटल टीम

186 9/10- बुमराह आणि टायमल मिल्स यांना स्मिथनं खातही उघडू दिलं नाही

185-7 : जयदेव उनादकटच्या रुपात मुंबई इंडियन्सने गमावली आणखी एक विकेट

177-6 : सुर्यकुमार यादवच्या खेळीला ब्रेक, रबाडाच्या गोलंदाजीवर तो 43 धावांवर झेलबाद झाला

पंजाबने बाजी मारली, मुंबई इंडियन्सने विजयाची संधी गमावली

 सुर्यकुमार यादवच्या खेळीला ब्रेक, रबाडाला मिळाली विकेट 

177-6 : सुर्यकुमार यादवच्या खेळीला ब्रेक, रबाडाच्या गोलंदाजीवर तो 43 धावांवर झेलबाद झाला

मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ तंबूत

152-5 : पोलार्डनंही रन आउटच्या रुपात फेकली विकेट, त्याने 10 धावांची खेळी केली. तिलक वर्मानंतर मुंबईने दुसरी विकेट रन आउटच्या स्वरुपात गमावली

सुर्या-तिलक ताळमेळाची कमी, मुंबई इंडियन्सला मोजावी लागू शकते मोठी किंमत

131-4 : चांगल्या लयीत खेळत असलेल्या तिलक वर्मा रन आउट होऊन तंबूत परतला, त्याने 20 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने संघासाठी 36 धावांचे बहुमूल्य योगदान दिले

तिलक वर्मा -ब्रेविस जोडी फुटली

116-3 : ओडियन स्मिथनं मुंबई इंडियन्सची सेट झालेली जोडी फोडून सामना पुन्हा पंजाबच्या बाजूनं वळवला. तिलक वर्मा आणि डेवॉन ब्रेविस या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ब्रेविसचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकल. त्याने 25 चेंडूत 49 धावांची दमदार खेळी केली.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील महागडा गडी स्वस्तात परतला

31-2 : सलामीवीर ईशान किशनही स्वस्तात तंबूत, वैभव अरोराला मिळालं यश

रबाडाने मुंबई इंडियन्सला दिला पहिला धक्का

31-1 : रबाडाला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहितनं फेकली विकेट, मुंबई इंडियन्सला पहिला धक्का. रोहितनं 17 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या

शिखर धवनसह  70(50) कर्णधार मयांकच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने निर्धारित 20 षटकात  केल्या 5 बाद 198 धावा

फटकेबाजी करण्याच्या नादात शाहरुख माघारी

197- शाररुखच्या फटकेबाजीला ब्रेक, 6 चेंडूत दोन उत्तुंग षटकारासह 15 धावा करुन तंबूत, थम्पीला दुसरं यश

सेट बॅट्समन शिखर धवन तंबूत

151-4 : शिखर धवनच्या रुपात पंजाबने गमावली आणखी एक विकेट, बासील थम्पीला पहिल यश. धवनने 50 चेंडूत 5 चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीने केल्या 70 धावा

बुमराहचा खतरनाक यॉर्कर, लिविंगस्टोनही तंबूत

130-3 : बुमराहने पंजाबला तिसरा धक्का दिला. त्याने स्फोटक लिविंगस्टोनला अवघ्या दोन धावांवर त्रिफळा उडवला

जॉनी बेयरस्टो माघारी, जयदेव उनादकटला यश

127-2 : सलामी जोडी फुटल्यानंतर मैदानात उतरलेल्या जॉनी बेयरस्टो अवघ्या 12 धावांची भर घालून तंबूत परतला. जयदेव उनादकटनं त्याला केलं बोल्ड

मुर्गन अश्विनला यश, पंजाबचा कर्णधार तंबूत

97-1 : अर्धशतकानंतर मयंक अग्रवाल माघारी; त्याने 32 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने कॅप्नन्सीतील पहिली फिफ्टी केली. मुर्गन अश्विनने मुंबईला पहिलं यश मिळवून दिले

पंजाबच्या सलामी जोडीनं पॉवर प्लेमध्ये दाखवली पॉवर

पंजाबच्या सलामी जोडीनं आक्रमक खेळ करत पहिल्या सहा षटकात 65 धावा कुटल्या आहेत. दोघही सेट झाली असून आता पॉवर प्लेनंतर ती कोणत्या गियरमध्ये खेळणार हे पाहणे रंजक ठरेल.

मयंक अग्रवाल आणि शिखर धवनची फटकेबाजी

मयंक अग्रवालने दोन खणखणीत चौकार खेचत उघडले संघाचे खाते; शिखर धवनचाही आक्रमक तोरा..मुंबई इंडिन्सच्या गोलंदाजांचे खांदे पडले

रोहित शर्मानं टॉस जिंकला...

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा संघ पहिल्यांदा बॅटिंग करताना किती धावांचे टार्गेट सेट करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

IPL 2022 MI vs PBKS यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील मैदानात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात स्पर्धेतील 23 वा सामना खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्सचा संघ चार पराभवातून सावरुन पुण्याच्या मैदानात पहिला विजय मिळवण्याच्या जवळ पोहचला. पण त्यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. धावांचा पाठलाग करताना त्यांना 12 धावांनी सामना गमवावा लागला. दुसरीकडे पंजाबचा संघ स्पर्धेतील पाचव्या सामन्यात तिसरा विजय नोंदवत स्पर्धेतील दावेदारी आणखी भक्कम करण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT