IPL 2022 New Playing Format Mumbai Indians and Chennai Super Kings will play 2 matches esakal
IPL

IPL 2022 फॉरमॅट बदलला; चेन्नईचा स्टेटस मुंबईबरोबरचाच

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या फॉरमॅटमध्ये (New Format) बदल करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामापासून 10 आयपीएल संघ (IPL Teams) झाल्यामुळे या दहा संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. या दोन गटात प्रत्येकी 5 संघ असतील पण, एक संघ 14 सामनेच खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये असणार याची माहिती आज दिली.

ग्रुप A मध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंटचा समावेश असणार आहे. तर ग्रुप B मध्ये चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर बेंगलोर, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सचा समावेश असणार आहे. (IPL 2022 New Playing Format Mumbai Indians and Chennai Super Kings will play 2 matches)

संघाचे स्थान कसे केले निश्चित?

संघाचे हे दोन ग्रुप आणि ग्रुपमधील त्यांचे स्थान हे आयपीएलच्या कामगिरीवर, त्यांनी किती विजेतीपदे (IPL Title) पटकावली आहे, कितीवेळा फायनल गाठली आहे त्याच्यावर ठरवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रुप A चा सर्वात वरचा संघ हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आहे. त्यांनी पाचवेळा विजेतपद पटकावले आहे. तर ग्रुप B मध्ये चारवेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) टॉपवर आहे. A आणि B ग्रुपच्या दुसऱ्या स्थानावर केकेआर आणि सनरायजर्स हैदराबाद आहे. तिसऱ्या स्थानावर राजस्थान आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर, चौथ्या स्थानावर दिल्ली आणि पंजाब आणि पाचव्या स्थानावर नवे दोन संघ लखनौ सुपर जायंट आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश असेल.

प्रत्येक संघ 14 सामने कसे खेळणार?

  • प्रत्येक संघ आपल्या गटातील प्रत्येक संघाबरोबर प्रत्येकी 2 सामना खेळेल. यामुळे एका संघाती ग्रुपमधील सामन्यांची संख्या 8 होईल.

  • त्यानंतर ते दुसऱ्या ग्रुपमधील संघांबरोबर प्रत्येकी एक सामना खेळतील. त्यामुळे एक संघाची सामन्यांची एकूण संख्या होईल 13

  • आता सामन्यांची संख्या विषम होत असल्याने आयोजकांनी अजून एक शक्कल लढवली आहे. त्यांनी ग्रुप A मधील संघ ग्रुप B मधील आपल्या बरोबरीच्या असलेल्या संघाबरोबर दोन सामने खेळेल. म्हणजे मुंबई चेन्नईबरोबर, कोलकाता हैदराबादबरोबर, राजस्थान आरसीबीबरोबर, दिल्ली पंजाब बरोबर आणि लखनौ गुजरातबरोबर अजून एक सामना खेळेल. त्यामुळे सगळ्या संघांची सामन्यांची संख्या 14 होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : पिकविमा जुलैमध्ये सुरू करण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT