preity zinta children's photos Goes Viral  Sakal News
IPL

IPL 2022 : पंजाबच्या विजयानंतर प्रितीची 'क्युट' पोस्ट व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलच्या 15 व्या हंगामात प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) पंजाब किंग्जने विजयी सलामी दिलीये. 200 पारच्या लढाईत पंजाबच्या संघाने रॉयल चॅलेंजर्सला (RCB) पराभवाचा दणका दिला. मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखालील संघाने यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेतच पहिल्या सामन्यातून दिले. आयपीएलमधील पंजाब संघाची मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा मात्र यावेळी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थितीत राहिल्याचे दिसले नाही. मेगा लिलावातही ती उपस्थितीत नव्हती. यामागचे कारण म्हणजे प्रिती झिंटा सध्या आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसते.

ती जरी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली नसली तरी घरी बसून तिने सामन्याचा आनंद घेतला आहे. पंजाबच्या विजयानंतर तिने एक खास पोस्ट केलीये. या पोस्टमध्ये तिने आपल्या जय आणि जिया यांचा खास फोटो शेअर केलाय. ही दोन मुल टीव्हीवर पंजाब संघाच्या सामन्याचा आनंद घेताना दिसते. नवी टीम, नवा कॅप्टन आणि नवे चाहते या कॅप्शनसह तिने आपल्या मुलांचा फोटो शेअर केलाय. जिय आणि जिया यांचा पहिला आयपीएल सामना अविस्मरणीय होता, असा उल्लेखही प्रितीने आपल्या पोस्टमध्ये केलाय.

प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफ यांनी 2016 मध्ये लॉस एंजलेसमध्ये लग्न केलं. लग्नानंतर प्रिती परदेशातच वास्तव्य करताना दिसली. बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या घरातूनच सामन्याचा आनंद घेत आहे. ती सरोगसीच्या माध्यमातून आई झाली असून तिच्या मुलांची नावे जय आणि जिवा असे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Video: "मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...", PM मोदींना भारतीय बॉक्सरने सांगितलेला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा ऐकून आवरेना हसू

Sugar Price: राज्यात साखरेचा तुटवडा, सणासुदीत भाव आणखी भडकण्याची शक्यता, किलोमागे किती मोजावे लागणार?

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

SCROLL FOR NEXT