Punjab Kings Shahrukh Khan Badshah Video Gone Viral  ESAKAL
IPL

VIDEO: केकेआर 'बादशाह'च्या गाण्यावर पंजाबच्या धडाकेबाज शाहरूखची एन्ट्री

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: पंजाब किंग्जने (Punjab Kings) आयपीएल 2022 (IPL 2022) च्या हंगामासाठी आपला सराव सुरू केला आहे. संघातील खेळाडू मैदानावर तर संघ व्यवस्थापन मैदानाबाहेरच्या तयारीत गुंतले आहेत. दरम्यान, पंजाब किंग्जने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे. पंजाब किंग्जचा धडाकेबाज फलंदाज शाहरूख खानचा (Shahrukh Khan) हा व्हिडिओ आहे.

पंजाब किंग्ज आपल्या पहिल्या वहिल्या आयपीएल विजेतेपदासाठी (IPL Title) यंदाच्या हंगामात चांगलाच जोर लावणार आहे. पंजाब आतापर्यंत फक्त एकदाच आयपीएलची अंतिम फेरी गाठू शकली होती. मात्र यंदा पंजाब शाहरूख खान सारख्या प्रतिभावंत खेळाडूंना घेऊन नव्या आशेने मैदानात उतरणार आहे. शाहरूख खानने यंदाच्या देशांतर्गत स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्याने तामिळनाडूला प्रसिद्ध मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचवले होते. तामिळनाडूने मुश्ताक अली ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

पंजाबच्या शाहरूख खानचे नाव हे बॉलिवूड स्टार आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) मालक शाहरूख खान (Bollywood Star Shahrukh Khan) याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा पंजाबकडून खेळणारा शाहरूख खान कायम चर्चेचा विषय असतो. शाहरूख आपल्या धडाकेबाज फलंदजीमुळे सामन्याचे चित्र क्षणात पालटण्याची क्षमता ठेवतो. पंजाबने शाहरूख खानने आपला सराव सुरू करतानाचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. त्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला बॉलीवूड स्टार शाहरूख खानच्या बादशाह चित्रपटातील टायटल साँग लावले आणि त्याला बादशाह ओ बादशाह असे कॅप्शनही दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT