IPL 2022 Rajasthan Royals vs Chennai Super Kings
IPL 2022 Rajasthan Royals vs Chennai Super Kings ESAKAL
IPL

CSK vs RR : आर अश्विनची झुंजार खेळी; राजस्थानचे प्ले ऑफ तिकिट फिक्स

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : आर. अश्विनने अडचणीत सापडलेल्या राजस्थान रॉयल्सला नाबाद 40 धावा करून विजयापर्यंत नेले. राजस्थान रॉयल्सने चेन्नईन सुपर किंग्जचे 151 धावांचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकात पार केले. राजस्थानकडून यशस्वी जैसवालने 59 धावांची खेळी केली. सीएसकेकडून प्रशांत सोळंकीने 2 विकेट घेतल्या. चेन्नईकडून मोईन अलीने दमदार खेळी करत 93 धावा केल्या. या विजयाबरोबरच राजस्थानने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले. तिसऱ्या स्थानावर असलेली राजस्थान दुसऱ्या स्थानावर झेप घेत थेट क्वालिफायर वन खेळणार आहे.

Highlights

आर. अश्विनची झुंजार खेळी, राजस्थानचा 

राजस्थानचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर आर. अश्विनने डाव सावरत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. शेवटच्या षटकात 7 धावांची गरज असताना अश्विनने मिथीशाला चौकार मारत सामना 4 चेंडूत 2 धावा असा आणला. अखेर मिथीशाने वाईड टाकत राजस्थानचे प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. अश्विनने 23 चेंडूत 40 धावा केल्या.

112-5 : प्रशांत सोळंकीने केली हेटमायरची शिकार

प्रशांत सोळंकीने राजस्थाची धडाडणारी तोफ शिमरॉन हेटमायरला अवघ्या 6 धावात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

104-4 : प्रशांत सोळंकी यशस्वीला बाद करण्यात यशस्वी

44 चेंडूत 59 धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जौसवालला अखेर प्रशांत सोळंकीने बाद केले.

 यशस्वी जैसवालचे दमदार अर्धशतक 

एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना सलामीवीर यशस्वी जैसवालने एक बाजू लागवून धरली. त्याने 39 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

76-3 : मोईन अलीने पडिक्कलचा उडवला त्रिफळा

मोईन अलीने देवदत्त पडिक्कलचा अवघ्या 3 धावांवर त्रिफळा उडवला.

67-2 : सँटनरने संजूला केले बाद

यशस्वी जैसवाल आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र सँटनरने 20 चेंडूत 15 धावा करणाऱ्या संजू सॅमसनला बाद केले.

16-1 : जॉस बटलर स्वस्तात माघारी

सिमरजीस सिंगने राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का दिला. त्याने जॉस बटलरला अवघ्या 2 धावेवर बाद केले.

राजस्थानने चेन्नईला 150 धावात थोपवले

146-6 :  मोईन अलीचे शतक हुकले 

अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या मोईन अलीला मॅकॉयने बाद केले. मोईन अलीने 57 चेंडूत 93 धावा केल्या.

 चहरने केली धोनीची शिकार 

युजवेंद्र चहरने 18 व्या षटकात महेंद्रसिंह धोनीला बाद केले. धोनीने 28 चेंडूत 26 धावांची खेळी केली.

मोईन अलीने सीएसकेला करून दिले शतक पार

मोईन अलीने नाबाद 75 धावांची खेळी करून चेन्नई सुपर किंग्जला 12 व्या षटकात शंभरी पार करून दिली.

95-4 : युझवेंद्र चहलचा क्लासी लेगस्पिन अन् रायुडू पॅव्हेलियनमध्ये

आजच्या सामन्यात शिवम दुबेच्या जागी संघात आलेल्या अनुभवी अंबाती रायुडूला युझवेंद्र चहलने एका चांगल्या लेगस्पिनवर 3 धावांवर बाद केले.

88-3 : मॅकॉयने जगदीशनला 1 धावेवर धाडले माघारी

85-2 : अश्विनने जोडी फोडली

राजस्थानच्या आर अश्विनने डेवॉन कॉनवे आणि मोईन अलीची जोडी फोडली. त्याने कॉनवेला 16 धावांवर बाद केले.

मोईन अलीचे 19 चेंडूत अर्धशतक

ऋतुराज बाद झाल्यानंतर मोईन अलीने दमदार फलंदाजी करत अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या दमदार खेळीमुळे सीएसकेने 6 षटकात 75 धावांपर्यंत मजल मारली.

2-1: चेन्नईला पहिल्याच षटकात मोठा धक्का

ट्रेंट बोल्टने सीएसकेचा फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाडला अवघ्या 2 धावेवर बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला.

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकली

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने आपल्या संघात एक बदल केला असून शिवम दुबेच्या जागी अंबाती रायुडू संघात परतला आहे. तर राजस्थानने आपल्या संघात एक बदल केला आहे. निशमच्या जागी हेटमायर संघात परतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT