Sanju Samson Sakal
IPL

IPL 2022 : पुण्यातील खास सामन्यात संजूचा क्लास शो!

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सनरायझर्स विरुद्धच्या (Sunrisers Hyderabad) सलामीच्या लढतीत राजस्थानचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसन याने धमाकेदार बॅटिंगचा नजराणा पेश केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथील मैदानात रंगलेला सामना संजूसाठी खास होता. तो राजस्थानकडून शंभरावा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूनं लागला नाही. केन विल्यमसननं याने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.

जोस बटलर (Jos Buttler) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) या जोडीनं राजस्थानच्या डावाला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावा करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर संजू सॅमसन (Sanju Samson) बॅटिंगसाठी मैदानात उतरला. राजस्थानकडून शंभराव्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. 27 चेंडूतील 55 धावांच्या आपल्या खेळीत त्याने काही सुरेख फटके मारले. 3 चौकर आणि 5 षटकाराने बहरलेली त्याची खेळी पुण्याच्या स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी अशी होती.

राजस्थानकडून शंभरावा सामना खेळणाऱ्या संजू सॅमसन याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 122 सामने खेळले आहेत. पंजाब विरुद्धच्या लढतीने 2013 मध्ये संजूनं आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळल्यानंतर तो राजस्थानच्या ताफ्यात सामील झालाय. आता त्याच्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. टीम इंडियातील अनुभवाच्या जोरावर स्वत:च्या कामगिरीसह संघाची कामगिरी उंचावण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. त्याच्या खात्यात 3000 हून अधिक धावा आहेत. 119 ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यंदाच्या हंगामात पहिल्या सामन्यातील कामगिरीत सातत्य राखून टीमला तो कुठपर्यंत घेऊन जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT