ipl 2022 mega auction bid  Sakal
IPL

IPL 2022 Mega Auction : RCB या खेळाडूवर लावेल 'विराट' बोली!

सुशांत जाधव

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. आगामी हंगामात भारतीय संघातील युवा खेळाडूवर सर्वाधिक बोली लागेल, असा दावा भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी केला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याच्याकडे नेतृत्वाची धूरा दिल्याचेही पाहायला मिळाले.

पण दुखापतीमुळे श्रेयस अय्यर (Shreayas Iyer) संघाबाहेर गेला आणि कॅप्टन्सीची माळ ही रिषभ पंतच्या (Rishabh Pant) गळ्यात पडली. तो संघात परतल्यानंतरही दिल्ली कॅपिटल्सने पंतकडे नेतृत्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) त्याला रिलीज केल्यापासूनच तो दुसऱ्या संघाचा कर्णधार होईल, अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

आयपीएलच्या मेगा लिलावात (IPL 2022 Mega Auction) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन फ्रेंचायझी कॅप्टन्सीसाठी भारतीय चेहरा शोधत आहेत. श्रेयस अय्यरला आपल्या ताफ्यात घेऊन त्याच्याकडे कॅप्टन्सी देण्यासाठी या दोन्ही संघात सामना रंगल्याचे चित्र मेगा लिलावामध्ये करण्यात पाहायला मिळू शकते.

भारताचा माजी क्रिकेट आणि सध्याच्या घडीला समालोचन करताना दिसणारे आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनीही यासंदर्भात मोठी भविष्य वाणी केलीये. विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व देण्याचा विचार करु शकते. यासाठी ते 20 कोटी रुपये मोजायला तयार होतील, असे मत आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले आहे.

आकाश चोप्रा यांनी युट्यूब चॅनेलवरील कार्यक्रमात मेगा लिलावासंदर्भात अंदाज वर्तवला आहे. ते म्हणाले की, आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरु शकतो. कोलकाता आणि बंगळुरु हे दोन्ही संघ चांगल्या कॅप्टनच्या शोधात आहेत. त्यांच्यासमोर श्रेयस अय्यरच्या रुपात उत्तम पर्याय उपलब्ध असेल. प्रिती झिंटाच्या मालकीचा पंजाब किंग्जही नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. पण पंजाब श्रेयस अय्यरसाठी मोठी रक्कम खर्च करणार नाही, असा अंदाजही आकाश चोप्रा यांनी वर्तवला आहे.

श्रेयस अय्यर 2 कोटी मूळ किंमत असलेल्या स्टार खेळाडूंमध्ये आहे. त्याच्याशिवाय परदेशी खेळाडूंमध्ये याच गटात असलेल्या कागिसो रबाडाला मोठी किंमत मिळेल, असेही आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे. त्याच्याशिवाय क्विंटन डिकॉक आणि डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंसाठी मोठी बोली लागू शकते, असेही आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT