IPL 2022 Virat Kohli Statement About Not Leaving Royal Challenger's Benglore  esakal
IPL

IPL 2022: विराटने आरसीबी का सोडली नाही?

अनिरुद्ध संकपाळ

विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Royal Challangers Benglore) हे समिकरण आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून अबाधित आहे. विराट कोहली (Virat Kohli) हा आयपीएल इतिहासातील बहुदा एकमेव खेळाडू आहे जो आयपीएलच्या (IPL) पहिल्या हंगामापासून आतापर्यंत एकाच संघाकडून खेळला आहे. विराट कोहलीने आरसीबीचे गेली आठ वर्षे नेतृत्व केले. आता त्याने आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आरसीबीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विराट कोहलीच्या संघासोबतच्या या प्रवासावर पॉडकास्ट प्रसिद्ध केले आहेत. या पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने आपण आरसीबी का सोडली नाही याचे कारण सांगितले. (IPL 2022 Virat Kohli Statement About Not Leaving Royal Challengers Benglore)

विराट कोहलीने आरसीबीसाठी (RCB) अनेक मॅच विनिंग खेळी साकारल्या आहेत. मात्र आरसीबीला अजूनही आयपीएल जिंकता आलेली नाही. तरीही विराट कोहली आणि आरसीबीचं नातं अबाधित आहे. विराटने सांगितले की, काही वेळा काही संघांनी त्याच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी काही करून लिलावत उतर असे सांगितले होते मात्र मी याच्यावर विचार केला.

विराट कोहलीने या पॉडकास्टमध्ये (RCB Podcast) आरसबी सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तो मिळालेल्या प्रेमाबद्दल म्हणतो की 'जर तुम्ही चांगली व्यक्ती असाल तर लोकांना तुम्ही आवडता. जर तुम्ही वाईट व्यक्ती असाल तर ते तुमच्यापासून दूर राहतात. आयुष्य असंच असतं.'

याबाबत विराट कोहली पॉडकास्टमध्ये म्हणाला की, 'आरसीबी बरोबरची एकनिष्ठता ही मी माझ्या आयुष्यात काही मुल्ये जपतो त्यासारखी आहे. चार-पाच लोकं अखेर तू एखाद्या संघाकडून आयपीएल जिंकलासच असे म्हणण्यापेक्षा मी आरसीबी सोबतच्या माझ्या एकनिष्ठतेला जास्त महत्व देतो. कारण कोणत्याही संघाकडून आयपीएल जिंकण तुम्हाला पाच मिनटाचा आनंद देऊन जाईल मात्र तुम्ही आयुष्यातील इतर गोष्टींनी दुःखी व्हाल.'

विराट कोहली पुढे म्हणाला की, 'या फ्रेंचायजीने मला पहिल्या तीन वर्षात जे काही दिले. माझ्यावर विश्वास ठेवला ही सर्वात खास गोष्ट आहे. अनेक संघांना मला घेण्याची संधी होती. त्यांनी मला पाठिंवा दिला नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT