LSG vs DC Weather Report | Cricket News in Marathi 
IPL

IPL 2023: लखनौमध्ये खेळल्या जाणारा LSG vs DC तिसरा सामना रद्द? मोठे कारण आले समोर

आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यावर मोठे संकट...

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 LSG vs DC Weather Report : आयपीएल 2023 मधील तिसरा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर आज सायंकाळी 7.30 वाजल्यापासून खेळल्या जाणार आहे. या सामन्यात पावसाचा धोका असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या सामन्यादरम्यान लखनौचे हवामान कसे असेल आणि या सामन्यात पाऊस पडेल की नाही हे जाणून घेऊया....

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील काही भागात मुसळधार आणि अवकाळी पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत लखनौ आणि दिल्ली यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पावसामुळे खेळ खराब होऊ शकतो.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळी पावसाची 20 टक्के शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून उष्णतेचाही परिणाम दिसून येईल. संध्याकाळनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर हा सामन्यात पाऊस पडू शकतो.

लखनौच्या एकना स्टेडियमच्या खेळपट्टीवर नाणेफेक खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. या मैदानावर आतापर्यंत एकूण 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 5 जिंकले आहेत आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने फक्त एकदाच विजय मिळवला आहे.

पहिल्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल राहते. पण, जसजसा खेळ पुढे जातो तसतशी खेळपट्टी गोलंदाजांना मदत करू लागते. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT