Ambati Rayudu 
IPL

Ambati Rayudu : अंबातीने शेवट केला गोड! संपूर्ण हंगामातील अपयश 19 धावात काढले धुवून

Kiran Mahanavar

Ambati Rayudu Chennai Super Kings IPL champions : इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज अंबाती रायडूने निवृत्तीची घोषणा केली. संपूर्ण मोसमात धावा काढण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला, परंतु त्याने गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या अंतिम सामन्यात शानदार फलंदाजी केली. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात त्याने 237.50 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 8 चेंडूत 19 धावा ठोकल्या.

चेन्नईला विजयासाठी 3 षटकात 38 धावांची गरज होती. गुजरातकडून मोहित शर्मा गोलंदाजीसाठी आला. तत्पूर्वी, शिवम दुबेने राशिद खानच्या षटकात लागोपाठ दोन षटकार ठोकले होते. रायुडूने मोहितच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. पुढच्याच चेंडूवर त्याने चौकार ठोकला. पुढच्या चेंडूवर त्याने पुन्हा षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर त्याने पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो झेलबाद झाला. बाहेर पडण्यापूर्वी त्याने आपले काम केले होते.

चेन्नईची धावसंख्या 12 षटकांत 3 बाद 133 अशी होती. रायुडू बाद झाला तोपर्यंत 12.4 षटकांत 4 बाद 149 धावा झाल्या होत्या. मात्र रायुडू बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मोहित शर्माने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सामना रोमांचक बनला होता. शेवटच्या चेंडूवर निर्णय झाला. शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावांची गरज होती आणि रवींद्र जडेजाने एक षटकार आणि एक चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: जुन्नरच्या दिव्या शिंदेची 'बिग बॉस मराठी ६ मध्ये एंट्री

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT