ipl-2023-eliminator 
IPL

IPL 2023 LSG vs MI : कर्णधार रोहित संघात करणार मोठा बदल! एलिमिनेटरमध्ये लखनौ अन् मुंबईची ही आहे प्लेइंग-11

Kiran Mahanavar

IPL 2023 Eliminator LSG vs MI Playing 11 : आयपीएलचा एलिमिनेटर सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज खेळल्या जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

मुंबईसाठी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या अंतिम साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने शानदार शतक झळकावले. मुंबईच्या फलंदाजांना त्यांची लय सापडली असून अशा परिस्थितीत लखनौच्या गोलंदाजांचा मार्ग सोपा होणार नाही.

लखनौ सुपर जायंट्सला मुंबईच्या फलंदाजांना रोखायचे असेल तर लेगस्पिनर रवी बिश्नोईला मोठी भूमिका बजावावी लागेल. लखनौची गोलंदाजी आणि मुंबईच्या फलंदाजीच्या कामगिरीवर या सामन्याचा चॅम्पियन ठरवला जाईल.

कशी असेल मुंबईची प्लेइंग इलेव्हन?

मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल अपेक्षित नाही. रोहित शर्मासोबत ईशान किशन डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर कॅमेरून ग्रीन आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव उतरू शकतात. या सामन्यात टिळक वर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकतात. गेल्या सामन्यात तो प्रभावशाली खेळाडूंच्या यादीत होता.

निहाल वढेरा आणि टीम डेव्हिड देखील संघात आहेत. पियुष चावला पुन्हा एकदा गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. वेगवान गोलंदाजांमध्ये जेसन बेहरेनडॉर्फसह आकाश मधवाल आणि ख्रिस जॉर्डनवर जबाबदारी असेल.

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.

लखनौची प्लेइंग इलेव्हन?

लखनौ सुपर जायंट्सने गेल्या सामन्यात सलामीवीर म्हणून करण शर्माला मैदानात उतरवले होते, पण पुन्हा एकदा क्विंटन डी कॉकसोबत ओपनिंग करताना दिसल. तिसऱ्या क्रमांकावर मंकड आणि त्यानंतर मार्कस स्टॉइनिसला आणि मधल्या फळीत कर्णधार कृणाल पंड्याला साथ देण्यासाठी निकोलस पूरन आणि आयुष बडोनी असतील.

संघाची गोलंदाजी फळीही सज्ज दिसत आहे. वेगवान गोलंदाजीत मोहसीन खान, यश ठाकूर आणि नवीन उल हक असतील. खेळपट्टीतील फिरकी मदत करू शकते. अशा परिस्थितीत रवी बिशोई यांच्यासोबत कृष्णप्पा गौतम जबाबदारी घेऊ शकतात. कृणाल पांड्याही फिरकी गोलंदाजी करेल.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : क्विंटन डी कॉक, करण शर्मा, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT