IPL 2023 Play Off
IPL 2023 Play Off  esakal
IPL

IPL 2023 Play Off : पंजाब आठव्या स्थानावर तरी आरसीबी इतकीच संधी कशी... कोणाला किती संधी एका क्लिकवर

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Play Off : मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यामुळे आयपीएल 2023 च्या प्ले ऑफचे गणित आणखीच किचकट झाले आहे. सध्याच्या घडीला गुजरात टायटन्स सोडली तर कोणता संघ प्ले ऑफ खेळेल याची शाश्वती आताच देता येत नाहीये. लखनौने मुंबईचा पराभव केल्याने मुंबईची प्ले ऑफ गाठण्याची शक्यता कमी झाली आहे. मात्र तरी देखील त्यांना अजूनही प्ले ऑफ गाठता येऊ शकते. सध्या आयपीएल लीगमधील फक्त 7 सामने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या संघाला प्ले ऑफ जिंकण्यासाठी किती टक्के संधी आहे हे आपण पाहणार आहोत.

1 - गुजरात टायटन्सने प्ले ऑफ मधील आपली जागा पक्की केली आहे. ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहणार आहे. कारण मुंबई आणि लखनौ यांच्यातील सामन्यात मुंबईचा पराभव झाल्याने आता कोणत्याही संघाला 18 गुण मिळवता येणार नाहीये.

2 - चेन्नई सुपर किंग्जला देखील पहिल्या चार संघात स्थान मिळवण्याची चांगली संधी आहे. त्यांना एकट्याला किंवा संयुक्तरित्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी 93 टक्के इतकी आहे.

3 - सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्सने नुकतेच मुंबई इंडियन्सचा पराभव केला. यामुळे त्यांना पहिल्या चार संघात स्थान मिळवण्याची 93 टक्के संधी आहे.

4 - मुंबई इंडियन्सने लखनौविरूद्धचा सामना गमावल्यामुळे ते सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरले आहेत. मात्र तरी देखील प्ले ऑफ गाठण्याची त्यांना अजूनही संधी आहे. त्यांना 78.1 टक्के संधी असून ते चौथ्या स्थानावर टाय होऊन प्ले ऑफ गाठू शकतात.

5 - आरसीबी सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांना देखील प्ले ऑफ गाठण्याची संधी आहे. मात्र ही संधी फक्त 43.8 टक्केच आहे. आरसीबी संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर राहू शकले तर त्यांना ही संधी आहे.

6 - राजस्थान रॉयल्स सध्या सहाव्या स्थानावर आहे. त्यांचे 13 सामन्यात 12 गुण झाले असून जर त्यांनी उरलेला आपला सामना जिंकला तर आणि आणि इतर सगळी गणितं जुळून आली तर चौथ्या स्थान गाठू शकतात.

7 - केकेआर सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यांना देखील संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर पोहचू शकतात. मात्र याची शक्यता फक्त 14.1 टक्केच आहे.

8 - पंजाब किंग्ज सध्या 12 सामन्यात 12 गुण झाले असून ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. जरी त्यांचे 12 गुण असले त्यांच्या हातात दोन सामने असल्याने त्यांची प्ले ऑफ गाठण्याची संधी ही जवळपास 43.8 टक्के इतकी आहे.

9 - नवव्या स्थानावर असलेल्या सनराईझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे प्रत्येकी 8 गुण झाले आहेत. त्यांचे प्ले ऑफचे तिकीट आधीच कापले गेले आहेत. ते जास्तीजास्त सहाव्या स्थानावरपर्यंत उडी मारू शकतात.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT