MS Dhoni IPL Final GT vs CSK Playing 11 esakal
IPL

IPL Final GT vs CSK Playing 11 : पाचव्या विजेतेपदावर नजर, हार्दिकविरूद्ध धोनी वापरणार 'हा' हुकमी एक्का

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni IPL Final GT vs CSK Playing 11 : आयपीएलच्या 16 व्या हंगमामाची आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सांगता होणार आहे. चार वेळा आयपीएल जिंकणारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सलग दुसऱ्या हंगामात फायनलमध्ये पोहचलेल्या गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याकडे गुरू - शिष्य सामना म्हणून देखील पाहिलं जात आहे.

गुजरातचा तगडा संघ हार्दिकच्या नेतृत्वात आपल्या होम ग्राऊंडवर आयपीएल फायनल खेळणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज धोनीच्या नेतृत्वात आपले पाचवे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करणार आहे. खेळपट्टी थोडीशी संथ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार धोनी कोणती रणनिती अवलंबणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

गुजरातविरूद्धच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनी काहीतरी वेगळा डाव खेळण्याची शक्यता आहे. यामुळे गुजरात टायटन्स अवाक होण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्ज अंतिम सामन्यात प्लेईंग 11 मध्ये महत्वाचा बदल करण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या प्लेईंग 11 मध्ये बेन स्टोक्सची एन्ट्री होऊ शकते. स्टोक्सला मोईन अलीच्या जागेवर प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते.

मोईन अलीने गेल्या 10 सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. मोईन अलीला फक्त 3 विकेट्स घेता आल्या आहेत. अहमदाबाद खेळपट्टीवर फिरकीला फारशी साथ मिळण्याची शक्यता नाही. स्टोक्स दुखापतग्रस्त असल्याने काही काळ बेंचवर बसून होता. मात्र त्यानंतर टीम कॉम्बिनेशनमुळे तो संघात खेळू शकला नाही.

स्टोक्स मोठ्या सामन्याचा खेळाडू

बेन स्टोक्स हा फायनल प्लेअर म्हणून ओळखला जातो. त्याने 2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये एकट्याच्या जीवावर इंग्लंड वर्ल्ड चॅम्पियन बनवले होते. 2021 च्या टी 20 फायनलमध्ये देखील त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. दोन्ही फायनलमध्ये त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सहसा आपल्या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये बदल न करणारा धोनी गुजरातविरूद्ध मात्र बेन स्टोक्सला खेळवू शकतो.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ :

ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, महीश तिक्षाणा, मथीशा पथिराना, मिचेल सँटनर, सुभ्रांशू सेनापती, शैक रशीद, आकाश सिंह, बेन स्टोक्स, ड्वेन प्रेटोरियस, सिसंडा मगाला, अजय जादव मंडल, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, राजवर्धन हंगरगेकर, भगत वर्मा, निशांत सिंधू

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT