IPL Final Weather Forecast
IPL Final Weather Forecast 
IPL

IPL Final Weather Forecast: आजही पाऊस! IPL फायनल झाली नाही तर धोनीचे स्वप्न भंगणार?

Kiran Mahanavar

CSK vs GT IPL Final 2023 Weather Forecast : आयपीएल 2023 चा अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार होता, पण रविवारी पावसामुळे आयपीएल चाहत्यांची निराशा झाली. सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही.

टॉसच्या वेळेच्या अर्धा तास आधी पाऊस सुरू झाला आणि थांबायचं काही नाव घेत नव्हता. आता विजेतेपदाचा सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी होणार आहे. मात्र राखीव दिवशीही पावसाची सावली आहे.

तसे पाहायला गेले तर राखीव दिवशी पावसाची फारशी शक्यता नाही. मात्र हवामान पुन्हा एकदा खलनायक ठरले तर धोनी ब्रिगेडचे पाचव्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगू शकते. राखीव दिवशी पावसामुळे अंतिम सामना झाला नाही तर चॅम्पियन संघाचा निर्णय लीग टप्प्यातील गुणांच्या आधारे केला जाईल.

अशा स्थितीत गतविजेत्या गुजरात टायटन्सला विजेता घोषित केले जाईल. जीटीचे लीग टप्प्यात 20 गुण होते आणि ते अव्वल स्थानावर राहिले. त्याचवेळी चेन्नईने 17 गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते.

अहमदाबादमध्ये सोमवारी दिवसा सूर्यप्रकाश असेल परंतु संध्याकाळी हवामान बदलू शकते. सायंकाळी 7.30 पासून अंतिम सामना खेळला जाणार आहे. नाणेफेक सात वाजता होईल. सामन्यादरम्यान पावसाची 10 टक्के शक्यता आहे. आर्द्रता 45-50 च्या दरम्यान राहू शकते. सुमारे 11 किलोमीटर प्रतितास वेगाने वारा वाहू शकतो. विशेष म्हणजे, ज्या प्रेक्षकांनी रविवारची फिजिकल तिकिटे घेतली होती, त्यांची तिकिटे सोमवारीही वैध असतील.

आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम सामना राखीव दिवशी होणार आहे. याआधी 15 सीझनमध्ये कधीही फायनल पुढे ढकलण्यात आलेली नाही. आयपीएलच्या नियमांनुसार कट ऑफ वेळेपर्यंत (12:06) अंतिम सामना सुरू न झाल्यास सामना राखीव दिवसासाठी पुढे ढकलला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT