Ipl 2023 Gujarat Titans captain Hardik Pandya fined  
IPL

Hardik Pandya: गुजरात टायटन्सला धक्का; हार्दीक पांड्यावर दंडात्मक कारवाई

हार्दिक पांड्यावर आयपीएलने दंडात्मक कारवाई केली

धनश्री ओतारी

गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्यावर आयपीएलने दंडात्मक कारवाई केली आहे. काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्सने विजय मिळवला पण आयपीएलने संघाला मोठा धक्का दिला आहे. (Ipl 2023 Gujarat Titans captain Hardik Pandya fined )

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने 6 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल आयपीएलच्या आचारसंहितेनुसार हार्दिक पांड्यावर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबद्दल आयपीएलने प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याला १३ एप्रिल 2023 रोजी मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध पार पडलेल्या सामन्यादरम्यान त्याच्या संघाने षटकांची गती कमी राखण्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गती कमी राखण्याबाबतची ही संघाची या हंगामातील पहिली चूक होती. त्यामुळे पांड्यावर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वी, षटकांची गती कमी राखल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यावरही 12 लाखांची दंडाची कारवाई झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT