ipl 2023-kane williamson-added-to-injured-players-rishabh pant-to-shreyas iyer-check-full-list-of-players  sakal
IPL

IPL 2023 मधून जवळपास 1 डझन खेळाडू बाहेर! 2 दिग्गज कर्णधारांचाही समावेश...

आतापर्यंत या हंगामात केवळ तीन सामने खेळले गेले आहेत परंतु जखमी खेळाडूंची यादी जवळपास....

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम सुरू झाल्यापासून या स्पर्धेत खेळणाऱ्या अनेक फ्रँचायझी संघांना धक्का बसला आहे. आतापर्यंत या हंगामात केवळ तीन सामने खेळले गेले आहेत, परंतु जखमी खेळाडूंची यादी जवळपास डझनभर पोहोचली आहे. सर्व लेटेस्ट नाव आहे ते गुजरात टायटन्सच्या अनुभवी फलंदाज केन विल्यमसनचे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला होता.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाला सुरुवात झाली असून जखमी खेळाडूंची संख्या 10 वर पोहोचली आहे. यातील बहुतांश खेळाडू स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दुखापतीमुळे बाहेर पडले होते तरी काहींना स्पर्धेत दुखापत झाली. आयपीएलच्या पहिल्या सामन्यानंतर या यादीत एका नावाचा समावेश करण्यात आला आहे. तसे जखमी खेळाडूंच्या यादीत दोन संघाच्या कर्णधारांचीही नावे आहेत.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत गेल्या वर्षी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो यावेळी स्पर्धेत सहभागी होणार नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झालेला कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे बाहेर आहे. याशिवाय चेन्नई, मुंबई, आरसीबी, राजस्थान आणि गुजरातच्या खेळाडूंची नावे जखमी खेळाडूंच्या यादीत आहेत.

जखमी खेळाडूंची यादी

  • ऋषभ पंत - दिल्ली कॅपिटल्स

  • श्रेयस अय्यर - कोलकाता नाईट रायडर्स

  • जसप्रीत बुमराह - मुंबई इंडियन्स

  • प्रसिद्ध कृष्णा - राजस्थान रॉयल्स

  • झ्ये रिचर्डसन - मुंबई इंडियन्स

  • विल जॅक - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

  • काइल जेमिसन - चेन्नई सुपर किंग्ज

  • जॉनी बेअरस्टो - पंजाब किंग्स

  • मुकेश चौधरी - चेन्नई सुपर किंग्ज

  • केन विल्यमसन - गुजरात टायटन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT