Krunal Pandya IPL 2023 esakal
IPL

Krunal Pandya IPL : आता माझं डोकं शांत झालंय, सगळं स्पष्ट... मारक्ररमची दांडी गुल केल्यावर कृणाल हे काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Krunal Pandya IPL 2023 : लखनौ सुपर जायंट्सने सनराईजर्स हैदराबादचा 5 विकेट्सनी पराभव करत होम ग्राऊंडवर आपला सलग दुसरा विजय साकारला. या विजयाबरोबरच लखनौने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. लखनौच्या या विजयात अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने गोलंदाजी तसेच फलंदाजीत देखील मोठे योगदान दिले. या कामगिरीनंतर पांड्याने आता तो चांगल्या मानसिकतेत असल्याचे सांगितले.

कृणाल पांड्याने आपल्या 4 षटकात फक्त 18 धावा देत 3 बळी टिपले. त्याने हैदराबादचा कर्णधार एडिन मारक्रमचा शुन्यावर त्रिफळा उडवत धमाका केला. कृणालच्या भेदक माऱ्याच्या जोरावर लखनौने हैदराबादला 121 धावात रोखले. त्यानंतर फलंदाजीत देखील कृणालने 23 चेंडूत 34 धावा करत मोलाचे योगदान दिले.

या कामगिरीनंतर सामना झाल्यावर कृणाल पांड्या म्हणाला की, 'या वर्षी मी चांगल्या मानसिकतेत आहे. ज्यावेळी तुमचे डोकं शांत असतं. तेथे स्पष्टता असते त्यावेळी योग्य गोष्टी घडत जातात. आता मी प्रक्रियेवर जास्त भर देतो. मी निकालाकडे फारसे लक्ष देत नाही.'

पांड्या पुढे म्हणाला, 'मी काही महिने क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. मी फक्त मर्यादित षटकांचेच सामने खेळत होतो. त्यामुळे मी माझ्या गोलंदाजीवर काम करण्यासाठी काही वेळ घेतला. गेल्या दोन ते तीन वर्षापासून मी खूप वेगळी गोलंदाजी करत होते. मात्र गेल्या तीन चार महिन्यापासून मी चेंडूला उंची देतोय आणि चेंडू वळवण्याचा प्रयत्न करतोय. याचा मला चांगला फायदा होत आहे.'

उत्कृष्ट चेंडूवर मारक्रमला बाद केल्यानंतर पांड्या म्हणाला, 'लोकं म्हणत होते की मी चेंडू फिरवू शकत नाही. त्यांना मारक्रमची विकेट हे माझे उत्तर आहे. मी आयपीएलच्या पहिल्या 4 ते 5 वर्षात कसे खेळत होतो याची उजळणी करत आहे. मी त्यावेळी मुंबईकडून चौथ्या क्रमांकावर खेळत होते. मी आता माझी लय आणि सातत्य परत मिळवण्याचा प्रयत्न करतोय.'

(Sports Latest News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT