RCB vs LSG 
IPL

RCB vs LSG: थरार सामन्यानंतर दोन्ही संघ अडचणीत, अखेच्या क्षणी काय झालं?

आयपीएलमध्ये काल लखनऊ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला

धनश्री ओतारी

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून मिळालेल्या 213 धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनौ सुपर जायंटस् संघाने 20व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर एक विकेट राखून रोमहर्षक विजय मिळवला. मात्र, या थरारक विजयानंतर दोन्ही संघ अडचणीत आले आहेत. आरसीबीला 12 लाखाचा फटका बसला आहे. तर लखनौच्या आवेश खानने आचारसहिंतेचे उल्लघन केले आहे. (Ipl 2023 Lsg And Rcb Code Of Conduct Breach Avesh Khan Faf Du Plessis Fined Rs 12 Lakh)

सामना जिंकल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सच्या आवेश खानने हेल्मेट जमिनीवर फेकून विजय साजरा केला. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसलाही पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर 12 लाखाचा दंड बसला आहे.

लखनौ सुपर जायंट्स आचारसंहितेच्या स्तर 1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. लखनौ सुपर जायंट्सच्या आवेश खानला आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. आवेश खानने आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्ह्याचा 2.2 भंग केल्याची कबुली दिली आहे. आचारसंहितेच्या लेव्हल 1 भंगासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे.

तर, आयपीएलने एक निवेदन जारी केले, 'आयपीएलच्या १५व्या सामन्यादरम्यान, बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने लखनौविरुद्ध संथ ओव्हर-रेटने गोलंदाजी केल्याचे दिसून आले. या हंगामात या संघाकडून स्लो ओव्हर रेटशी संबंधित आयपीएल नियम मोडण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलमध्ये काल लखनऊ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. या रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर लखनऊने 1 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने 2 बाद 212 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात एलएसजी संघाने पूरण-स्टोइनिसच्या वादळी खेळीच्या जोरावर 9 गडी गमावून विजय मिळवला.आरसीबीसाठी विराट कोहली, फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतकी खेळी खेळली. तर सिराज आणि पारनेल यांनी 3-3 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT