IPL 2023 Play Off CSK MI RCB  ESAKAL
IPL

IPL 2023 Play Off : काय हंगाम आहे! संघ 15 गुणांसह होणार पात्र मात्र 16 गुण ठरू शकतात धोक्याचे...

प्ले ऑफची चुरशीची लढाई: अंतिम सामन्यांपूर्वी गुणांचा गोंधळ, पात्रतेची नवी समीकरणे

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Play Off : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील लीग स्टेजच्या सामने आता संपत आले आहेत. लीग स्टेजच्या शेवटच्या आठवड्यात प्ले ऑफ गाठण्यासाठी अनेक संघ एक एका गुणासाठी झगडत आहेत. गुजरात टायटन्स आधीच प्ले ऑफमध्ये पहोचला आहे. त्यांचे 18 गुण झाले असून त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पक्के केले आहे. दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांचा जवळपास खेळ खल्लास झाला आहे.

उर्वरित सर्व संघ गुणतालिकेत पहिल्या चार संघांमध्ये पोहचण्यासाठी आपला शेवटचा जोर लावत आहेत. यंदाच्या हंगामात कोणता संघ किती गुण घेऊन प्ले ऑफ गाठेल हे सांगणे खूप कठिण आहे. सहसा 16 गुण घेणारे संघ सेफ समजले जातात. मात्र यांदाच्या हंगामात 16 गुणांना नाही तर 15 गुणांना जास्त महत्व प्राप्त झाले आहे. याबाबतच भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने एक भारी ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

आकाश चोप्रा आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'ज्यांचे गुण 15 झाले आहेत ते प्ले ऑफ क्वालिफाय करू शकतात आणि 16 गुण घेतलेले संघ प्ले ऑफच्या बाहेर राहू शकतात. काय अद्भुत आयपीएल हंगाम आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स 17 गुण मिळवू शकतात. ते प्ले ऑफमध्ये पात्र होतील. मात्र जरी ते दोन्ही संघ 15 गुणांवर राहिले तरी ते पात्र होतील. फक्त पंजाब किंग्ज, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स हे 16 गुणांपर्यंत पोहचू नयेत. जर सीएसके आणि लखनौ 17 गुणांपर्यंत पोहचले आणि मुंबई, पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांनी 16 गुण मिळवले. तर ज्या संघाचे नेट रनरेट चांगले आहे तो संघ पात्र होईल. काय हंगाम आहे.'

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील प्ले ऑफचे समीकरण सध्या खूप रंजक झाले आहे. आयपीएलच्या हंगामातील लीग स्टेजचे अजून 6 सामने शिल्लक आहेत. अशा परिस्थिती रविवारी होणाऱ्या डबल हेडरपूर्वी प्ले ऑफमध्ये कोण जाणार आणि कोण नाही हे स्पष्ट होण्याची शक्यता नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT