IPL 2023 PlayOff Scenario and Points Table sakal
IPL

IPL 2023 Points Table Playoff Scenario: प्लेऑफच्या शर्यतीत एका मॅचमुळे खळबळ; जाणून घ्या समिकरण

आता प्रत्येक संघाला एक पराभव काळजाचा ठोका चुकवणार ...

Kiran Mahanavar

IPL 2023 Points Table Playoff Scenario : आयपीएलची 2023 उत्सुकता शिगेला पोचली आहे. आता प्रत्येक संघाला एक पराभव काळजाचा ठोका चुकवणार आहे. एक पराभव संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी पुरेसे आहे, तर एक विजयाने देखील प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवू शकतो. विशेष बाब म्हणजे लीग आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे, मात्र आजुनही एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही किंवा शर्यतीतून बाहेर पडला नाही.

मात्र आता अव्वल 4 संघ अडचणीत आले आहेत. गुणतालिकेत तळाचे संघ पुनरागमन करत अव्वल संघांचा खेळ खराब करत आहेत. दरम्यान संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने ज्या प्रकारे सलामीचे सामने जिंकून विजयी सुरुवात केली होती, ती आता कमकुवत होताना दिसत आहे, तर या संघासमोर आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचे खडतर आणि मोठे आव्हान आहे.

आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबलवर पाहता राजस्थान रॉयल्सचा संघ अजूनही चौथ्या क्रमांकावर आहे. पण राजस्थान रॉयल्सचा संघ जिथे उभा आहे, तिथे आणखी तीन संघ आहेत. उर्वरित तीन संघांनी आपले सामने जिंकले, तर राजस्थान रॉयल्स संघ चौथ्या क्रमांकावरून आणखी खाली जाऊ शकतो.

राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी पाच जिंकले आहेत, तर सहा पराभव पत्करले आहेत. पण आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जने त्यांच्या दहा सामन्यांत दहा गुण मिळवले आहेत. म्हणजेच, यापैकी कोणताही संघ 11 सामने पूर्ण केल्यानंतर 12 गुण मिळवून आरआरच्या पुढे जाऊ शकतो.

राजस्थान रॉयल्सच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या पाचपैकी संघाने चार जिंकले होते आणि एकात पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता चित्र पूर्णपणे बदले आहे. यानंतर खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला आणि एकच जिंकता आला, म्हणजे संघाची गाडी रुळावरून घसरल्याचे दिसत आहे.

दरम्यान, मजेशीर गोष्ट अशी आहे की, खाली असलेले तिन्ही संघ बरोबरीवर उभे आहेत. त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे, पण आकड्यांचं गणित बघता ते संघ अजूनही बाहेर गेले नाही.

नितीश राणाच्या नेतृत्वाखालील केकेआरचे दहा सामन्यांत आठ गुण, एडन मार्करामच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचे दहा सामन्यांत आठ गुण आणि डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचे दहा सामन्यांत आठ गुण आहेत. म्हणजेच जेव्हा 11 सामने पूर्ण होतील, त्यावेळेस कोणता ना कोणता संघ विजय मिळवून त्यांचे गुण दहा करेल. अशा स्थितीत आगामी काळात प्लेऑफची शर्यत आणखी तीव्र होऊ शकते.

पॉइंट टेबलनुसार, गुजरात टायटन्स हा एकमेव संघ आहे ज्याचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित मानला पाहिजे. कारण त्याच्याकडे 11 सामन्यांत 16 गुण आहेत, पण संघ अद्याप अधिकृतपणे प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकलेला नाही. आगामी सामने आणखीनच रंजक असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT