IPL 2023 Points Table sakal
IPL

IPL 2023 Points Table: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर प्लेऑफची शर्यत झाली रंजक! 'या' संघाचे वाढले टेन्शन

लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामना रद्द झाल्यामुळे आणखीनच रंजक वाढली आहे आता...

Kiran Mahanavar

IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 चा 46 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने पंजाबचा 6 गडी राखून पराभव केला. मुंबईच्या विजयाने अनेक संघांचे समीकरण पुन्हा एकदा बिघडले आहे. या मोसमातील 9 सामन्यांमधला मुंबईचा हा पाचवा विजय आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ या विजयासह गुणतालिकेत 10 गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्स यंदाच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्याच वेळी या शर्यतीत सर्व 10 संघ अजूनही अबाधित आहेत.

पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या विजयाने पाच संघ टेन्शन मध्ये आहेत. त्या संघांमध्ये लखमाऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि खुद्द पंजाब किंग्ज यांचा समावेश आहे. हे सर्व संघ जवळपास सारख्याच स्थितीत आहेत.

लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामना रद्द झाल्यामुळे आणखीनच रंजक वाढली आहे. आता परिस्थिती अशी आहे की यापैकी कोणताही संघ कधीही टॉप 4 मधून बाहेर पडू शकतो. अशा स्थितीत पाहिल्यास मुंबईच्या एका विजयाने अन् एकादा संघ टॉप 4 मधून बाहेर. गुजरात टायटन्सचा संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकांत 3 गडी गमावून 214 धावा केल्या. मुंबईसमोर 215 धावांचे लक्ष्य होते. दुसऱ्या डावात मुंबईने 18.5 षटकांत 4 गडी गमावून या लक्ष्याचा पाठलाग केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT