IPL 2023 Points Table :
IPL 2023 Points Table : sakal
IPL

IPL 2023 Points Table: गुजरात टायटन्स होऊ शकतात बाहेर! मुंबई इंडियन्सने बिघडवले सर्व संघांचे समीकरण

Kiran Mahanavar

IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने टेबल टॉपर्स गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव केला. गुजरातच्या पराभवामुळे प्ले ऑफची शर्यत आणखीनच तीव्र झाली आहे.

मुंबई इंडियन्सने सर्व संघांचे टेन्शन दुप्पट केले आहे. मुंबईसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता आणि त्यांनी या सामन्यात त्यानुसार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या शतकामुळे त्याच्या संघाने हा सामना अगदी सहज जिंकला.

मुंबई इंडियन्सच्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या विजयाने सर्वच संघांचे समीकरण बिघडले आहे. तीन संघ (गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज) वगळता जवळपास सर्वच संघ सध्या मध्यभागी अडकले आहेत. विशेषत: राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, या संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली.

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकला असता तर आज त्यांच्या संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान सहज निश्चित केले असते. पण तसे होऊ शकले नाही आणि मुंबईने गुजरातची स्वप्ने उद्ध्वस्त केली.

आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 57 सामने खेळले गेले आहेत. इतके सामने होऊनही अद्याप एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. आयपीएलच्या इतिहासात असे क्वचितच घडले आहे. गुजरात संघाने मोसमाच्या सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली आहे. पण हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स अजूनही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकते.

चला संपूर्ण समीकरण समजून घेऊया, जर गुजरात टायटन्सने त्यांचे उर्वरित सर्व सामने येथून वाईटरित्या गमावले आणि राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सने त्यांचे सर्व सामने जिंकले, तर गुजरात टायटन्स अजूनही प्लेऑफमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2023 आतापर्यंत ज्या पद्धतीने पार पडत आहे ते पाहता टॉप 2 साठी तीन संघांमध्ये निकराची लढत होत असल्याचे दिसते. शुक्रवारच्या पराभवानंतर गुजरात टायटन्सला टॉप 2 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे. खरं तर, CSK आणि मुंबई इंडियन्स इथून त्यांचे सर्व सामने जिंकतात, तर GT त्यांचा एक सामना गमावल्यास टॉप 2 मधून बाहेर पडू शकतात. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्सला क्वालिफायर 1 खेळायचा असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Mumbai Election: सोमवारी ठाकरे गटाच्या पोलिंग एजेंटचा टॉयलेटमध्ये मृत्यू, तर निवडणूक अधिकाऱ्याचा हर्ट अटॅकने मृत्यू

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात ते कोण गाठणार IPLची अंतिम फेरी?

Latest Marathi News Live Update: नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक

SCROLL FOR NEXT