IPL 2023 rajasthan royals won only 2 percent agains gujarat titans  
IPL

IPL 2023: राजस्थानला सामना जिंकण्याचा केवळ 2 टक्के होता चान्स, पण खेळाडूंनी मॅचचे गणितच बदलले

राजस्थानला जिंकण्यासाठी केवळ २ टक्के चान्स उरला असतानाच...

धनश्री ओतारी

आयपीएल १६ व्या सीझनमध्ये २३ वा सामना रविवारी रात्री गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. यावेळी राजस्थानला जिंकण्यासाठी केवळ २ टक्के चान्स उरला असतानाच खेळाडूंनी सामन्याचे गणित बदलले अन् गुजरातचा पराभव केला. (IPL 2023 rajasthan royals won only 2 percent agains gujarat titans )

कर्णधार संजू सॅमसन आणि डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायर यांच्या दमदार अर्धशकती खेळीच्या जोरावर राजस्थानने गतविजेत्या गुजरात टायटन्सवर ३ विकेट ४ चेंडू राखून मात केली. या विजयासह राजस्थानचा संघ गुणतक्त्या पहिल्या स्थानावर कायम राहिला आहे.

राजस्थान रॉयल्स संघाला जिंकण्यासाठी २ टक्के चान्स असतानाच खेळाडूंनी मोठी चाल केली. संघाच्या चार खेळाडूंनी 13 व्या षटकातच कर्णधार संजू सॅमसनने सुरुवात केलेल्या या सामन्याचे संपूर्ण गणितच बदलून टाकले होते.

संजू सॅमसनने 13व्या षटकात रशीद खानला लागोपाठ तीन षटकार ठोकले. यानंतर वेग पूर्णपणे राजस्थानकडे सरकला. त्याच्यासोबत शिमरॉन हेटमायरचीही बॅट तळपली अन् गुजरातच्या गोलंदाजांना चांगलेच फटाकारले.

संजू सॅमसन 32 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 60 धावांची तुफानी खेळी करून बाद झाला. यानंतर रियान पराग शिमरॉन हेटमायरला साथ देण्यासाठी आला. त्याने 7 चेंडूत 5 धावा केल्या. परागनंतर ध्रुव जुरेल फलंदाजीला आला आणि त्याने 10 चेंडूत 18 धावा करत संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

यादरम्यान शिमरॉन हेटमायर एका बाजूने वेगवान धावा करत होता. त्यानंतर अश्विन जुरेल यानेही दोन चेंडूत आणखी एक षटकार मारला आणि तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला.

दुसरीकडे, शिमरॉन हेटमायरने एक टोक पकडले होते. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 56 धावांची नाबाद खेळी खेळली आणि राजस्थानला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT