IPL 2023 Play Off Possibilities esakal
IPL

IPL 2023 Play Off : आरसीबी काय दिल्लीही प्ले ऑफमध्ये पोहचणार, वाचा सर्व 10 शक्यता

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Play Off Possibilities : आयपीएल 2023 मधील प्ले ऑफमधील गणित या आठवड्यात चांगलेच गुंतागुंतीचे होणार आहे. लीगमधील आता 16 सामने शिल्लक राहिले आहेत. अजून तरी 10 च्या 10 संघ प्ले ऑफच्या शर्यतीत अजून आपले आव्हान जिवंत ठेवून आहेत. यात आरसीबीचा देखील समावेश आहे. ते देखील अजून प्ले ऑफमध्ये जाऊ शकतात मात्र त्यांची शक्यता फार कमी दिसत आहे.

1 गुजरात टायटन्सने जवळपास आपले प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. जर समजा त्यांनी इथून पुढे अत्यंत खराब कामगिरी केली तरी ते तिसऱ्या स्थानावर एक किंवा अनेक संघांसोबत टायवर पोहचेल. त्यांचे टॉप 4 मध्ये पोहचण्याची 100 टक्के शक्यता आहे. कारण त्यांचे नेट रनरेट दमदार आहे.

2 चेन्नई सुपर किंग्जचे प्ले ऑफमध्ये 85.2 टक्के संधी आहे. निकालाचे 56 हजार कॉम्बिनेश सीएसकेच्या बाजूने आहेत.

3 मुंबई इंडियन्सने आरसीबीचा सहा विकेट्सनी पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचली. आता त्यांची प्ले ऑफ खेळण्याची शक्यता 76.6 टक्के आहे. ते तिसऱ्या स्थानावर पोहचू शकतात. मात्र हा सगळा खेळ नेट रनरेटवर अवलंबून आहे.

4 लखनौ सुपर जायंट्स सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. मात्र असे असले तरी त्यांचे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता ही 46 टक्केच उरली आहे. ही शक्यता देखील जर ते चौथ्या क्रमकांसाठी अनेक संघांसोबत संयुक्तरित्या पोहचतील.

5 राजस्थान रॉयल्सने हंगामाची सुरूवात चांगली केली होती. मात्र जसजशी स्पर्धा पुढे सरकत गेली तसतसे त्यांची प्ले ऑफची शक्यता कमी कमी होत गेली. सध्या त्यांची प्ले ऑफमध्ये पोहचण्याची शक्यता 36.6 टक्के राहिली आहे.

6 कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या हंगामात काही रोमहर्षक विजय मिळवले. मात्र सध्या ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. त्यांचे प्ले ऑफमध्ये पोहचण्याची 37.2 टक्के शक्यता आहे.

7 सोमवारी केकेआर आणि पंजाब यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात पंजाब जर केकेआरकडून हरला तर त्यांची प्ले ऑफ गाठण्याची संधी 36 टक्केच राहील.

8 आरसीबीने मुंबईविरूद्धचा सामना गमावल्याने त्यांची प्ले ऑफ खेळण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. आता आरसीबी प्ले ऑफ गाठण्याची फक्त 35.3 टक्केच शक्यता दिसत आहे.

9 सनराईजर्स हैदराबाद सध्या गुणतालिकेत नव्या स्थानावर आहे. त्यांची प्ले ऑफ गाठण्याची शक्यता ही 23.8 टक्केच आहे. मात्र सध्या प्ले ऑफचे गणित असे अडकले आहे की सर्व संघांना कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता आहे.

10 सध्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स तळात दहाव्या क्रमांकावर आहे. असे असले तरी दहाव्या क्रमांकाच्या दिल्ली कॅपिटल्सलाही प्ले ऑफ खेळण्याची संधी आहे. मात्र चौथ्या स्थानावर टाय होऊन प्ले ऑफमध्ये दिल्ली पोहचण्याची शक्यता फक्त 22.7 टक्के आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT