Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore sakal
IPL

RR vs RCB : आरसीबी जिंकूनही नाही पोहोचणार टॉप 4 मध्ये, बिघडले पूर्णपणे समीकरण

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना जरी RCBने जिंकला तरी त्यांचा संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करू शकणार नाही कारण...

Kiran Mahanavar

Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore : आयपीएल 2023 चा 60 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. आजचा सामना जो हरेल त्याला पुनरागमन करत प्ले-ऑफमध्ये जाणे कठीण होईल. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.

राजस्थानमधील जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळल्या जाणार आहे. पण आज होणारा सामना जरी आरसीबीने जिंकला तरी त्यांचा संघ सध्यातरी टॉप 4 मध्ये स्थान मिळवू शकणार नाही. चला संपूर्ण समीकरण समजून घेऊ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत. आरसीबीचा संघ सध्या 11 सामन्यांत 5 विजय आणि 6 पराभवांसह गुणतालिकेत 7व्या स्थानावर आहे. त्याच वेळी आरआरचा संघ 12 सामन्यांत 6 विजय आणि 6 पराभवांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या संघाचे यंदाच्या मोसमात 13 गुण आहेत. जर आरआरने हा सामना जिंकला तर त्यांच्या संघाचे 14 गुण होतील आणि ते चौथ्या स्थानावर पोहोचतील. दुसरीकडे जर आरसीबीने हा सामना जिंकला, तर त्यांचा संघ इच्छा असूनही चौथ्या स्थानावर पोहोचू शकणार नाही कारण त्यांच्या संघाचे केवळ 12 गुण होतील. अशा स्थितीत आजचा सामना जिंकूनही आरसीबीला चौथ्या क्रमांकावर पोहोचता येणार नाही.

या सामन्यात आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत पराभवाची हॅट्ट्रिक टाळावी लागणार आहे. संघातील काही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, मात्र दरवर्षीप्रमाणे त्यांची गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. त्याचबरोबर मधल्या फळीलाही महत्त्वाच्या प्रसंगी योग्य कामगिरी करता येत नाही.

गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, मोहम्मद सिराजशिवाय कोणताही गोलंदाज चांगली कामगिरी करू शकत नाही. हर्षल पटेल आपल्या संघाची सतत निराशा करत आहे. अशा स्थितीत त्यांनी या क्षेत्रात खूप विचार करण्याची गरज आहे.

आयपीएल 2023 साठी RCB संघ - फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, केदार जाधव, विजयकुमार वैशाक, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कर्ण शर्मा, फिनिश अॅलन, अनुज रावत, मायकेल ब्रेसवेल, सिद्धार्थ कौल, सोनू यादव, मनोज भंडगे, वेन पारनेल, राजन कुमार, अविनाश सिंग, हिमांशू शर्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT