Sayali Sanjeev new insta post after Ruturaj Gaikwad Hits Six 
IPL

IPL 2023: वहिनी काल मॅच जिंकलो म्हणून...सायली संजीवच्या नव्या पोस्टवर नेटकऱ्यांचा सवाल

ऋतुच्या षटकारानंतर सायलीची इंस्टा पोस्ट चर्चेत

धनश्री ओतारी

देशभरात आयपीएलचा फिव्हर पाहायला मिळत आहे. अशातच सध्या क्रिकेट विश्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे मराठी अभिनेत्री सायली संजीवची. धडाकेबाज ऋतुराज गायकवाडचं नावं आलं की सर्वांच्या डोळ्यासमोर सायली आल्याशिवाय राहत नाही. आताही तेच झालं. इकडे ऋतुराजने काल षटकार मारत सर्वांचे लक्ष वेधले, तर आज सायलीने पिवळ्या रंगाचा कुडता परिधान करत चर्चेला उधाण आणलं. ( Sayali Sanjeev new insta post after Ruturaj Gaikwad Hits Six)

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर किंग्ज यांच्यातील आयपीएल 2023च्या लढतीत CSK सलामीवीरांनी धमाका केला. दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर उभ्या असलेल्या टाटा टियागो कारवर ऋतुराज गायकवाडने षटकार मारला.

त्यानंतर ऋतुराजवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. दरम्यान, सायलीने नुकतंच नवं फोटो शेअर केले आहेत. सायली नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. यावेळी तिने पिवळ्या रंगाच्या कुडत्याचा लुक शेअर केला आहे. तिच हा लुक पाहून नेटकऱ्यांनी अने तर्क वितर्क लावले आहेत.

वहिनी काल match जिंकलो म्हणून yellow dress का?? असा सवाल एका नेटकऱ्यांने उपस्थित केला आहे. Oo ho are you csk fan and rutu raj , Rutu ka Raj, Sayali ruturaj Gaikwad vahini saheb अशा अनेक कमेंट्स तिच्या पोस्टवर येत आहेत.

गायकवाडने चौथ्या षटकात फिरकी गोलंदाज अष्टपैलू कृष्णप्पा गौतमच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. तो थेट टाटा कारला लागला आणि तो तिथे डेंट झाला. अशा स्थितीत टाटा टियागो ईव्ही चेंडू मारल्यावर 5 लाख रुपये देणार आहे.

जेव्हा जेव्हा चेंडू थेट टाटा टियागो ईव्हीवर लागल, तेव्हा 5 लाख रुपये दिले जातात. या पैशांचा उपयोग कर्नाटकातील कॉफीच्या मळ्यातील जैवविविधता वाढवण्यासाठी रोपे लावून केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऋतुराज आणि सायलीच्या अफेअरच्या चर्चा सुरु आहेत. सायलीच्या प्रत्येक पोस्टवर ऋतुराजचं नावनं तिला डिवचले जाते. ऋतुराजने सायलीच्या वनपीस घातलेल्या फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटमुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या.

ऋतुराजने तिच्या त्या फोटोवर वाह अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले होते. त्यावर सायलीनेही हार्ट इमोजी शेअर करत त्याला रिप्लाय दिला होता. त्यानंतरच त्यांच्या अफेरच्या चर्चांना उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर मोठी घटना, प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Crime News : भगवा दुपट्टा घालून मांसाहार केल्याने तरुणाला मारहाण, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात... नेमका कुठं घडला प्रकार?

Ganeshotsav 2025 : 'शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम; गणेशोत्सवासाठी नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास दिली भेट

Online Gaming Bill: ऑनलाईन गेमिंग बिल! केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; नेमका कायदा काय? कशावर येणार बंधन?

SCROLL FOR NEXT