RCB vs CSK | Head to Head | IPL X/RCBTweets
IPL

IPL 2024, CSK vs RCB: चेन्नई की बेंगळुरू, कोणाचं पारडं राहिलंय जड? कशी असेल संभावित प्लेइंग-11, घ्या जाणून

CSK vs RCB, Head to Head playing 11: चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा राहिला आहे आणि आयपीएळ 2024 मधील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, हे जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

IPL 2024, CSK vs RCB: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहे. शुक्रवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

या सामन्याने आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होईल. या सामन्यापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. तसेच चेन्नई संघातून रचिन रविंद्र पदार्पण करण्याची शक्यता आहे. याशिवाय चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नवे चेहेरे दिसण्याची शक्यता कमी आहे. एमएस धोनी या सामन्यापासून केवळ यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसेल.

तसेच बेंगळुरू संघात फलंदाजी फळीत कर्णधार फाफ डू प्लेसिससह विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल रजत पाटीदार हे कायम राहू शकतात. याशिवाय या सामन्यातून कॅमेरॉन ग्रीनचे बेंगळुरू संघाकडून पदार्पण होऊ शकते.

मात्र, बेंगळुरूला एका अनुभवी फिरकी गोलंदाजाची कमी भासू शकते. त्यांच्याकडे रिस टोप्ली, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप असे चांगले वेगवा गोलंदाज आहेत.

आमने-सामने आकडेवारी

चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात आत्तापर्यंत 31 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील चेन्नईने 20 सामने जिंकले आहेत, तर 10 सामने बेंगळुरू संघाने जिंकले आहेत. एका सामन्याला निकाल लागलेला नाही.

आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिल्या सामन्यासाठी संभावित प्लेइंग इलेव्हन

  • चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रविंद्र, मोईन अली, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, मिचेल सँटेनर, महिश तिक्षणा.

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पाषाणमध्ये नदीत वाहून आला मृतदेह, ५-६ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता; हत्या की आत्महत्या?

School Fee: आता युपीआयद्वारे एका क्लिकवर शाळेची फी जमा करता येणार! केंद्र सरकारचे मोठे पाऊल, आदेशाचे पत्र जारी

Latest Marathi News Live Update : कल्याण डोंबिवलीत बाईकचा लाईट लावून अंत्यसंस्कार

भाजपला मोठा धक्का बसणार! बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशांचे किती सैनिक मारले गेले? वाद नेमका कुठून सुरू झाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT