m s dhoni sakal
IPL

सुपरकिंग थाला! षटकारांच्या हॅट्रिकनंतर दिलं चिमुरडीला स्पेशल गिफ्ट.. का होतंय धोनीचं कौतुक ?

इंडियन प्रीमियर लीगचा २९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये वानखेडे स्टेडियम मुंबई येथे खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने मुंबईला २० धावांनी पराभूत केले. या सामन्यात चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने शेवटच्या षटकात ४ चेंडूत ३ सिक्स ठोकत संघाला २० धावा करुन दिल्या.

सकाळ डिजिटल टीम

IPL 2024 | इंडियन प्रीमियर लीगचा २९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये वानखेडे स्टेडियम मुंबई येथे खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने मुंबईला २० धावांनी पराभूत केले. या सामन्यात चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने शेवटच्या षटकात ४ चेंडूत ३ सिक्स ठोकत संघाला २० धावा करुन दिल्या. विजयाची चर्चा सुरु असतानाच धोनीच्या कृत्याने चाहत्यांचे लक्ष्य वेधले आहे.

सध्या सोशल मिडीयावर धोनीचा एक फोटो व्हायरल होत आहे. धोनी चेन्नईच्या फलंदाजीनंतर ड्रेसिंग रुमकडे निघाला होता, तेव्हा त्याने एका लहान मुलीला चेंडू गिफ्ट केला आहे. त्याने दिलेलं गिफ्ट त्या लहानग्या मुलीला प्रचंड आवडले. यावरुन स्पष्ट दिसते की धोनी आपल्या उत्तम परफाॅर्मन्सशिवाय आपल्या चाहत्यांची मने सुद्धा जिंकत असतो. चाहते सुद्धा धोनीला मोठ्या प्रमाणात पसंती देत असतात.

महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल असल्याच्या चर्चा आहेत. धोनीचे वय ४२ वर्ष झाले आहे, त्याच्या वयानुसार त्याचा फिटनेस पहिल्यासारखा राहिलेला नाही. तरी सुद्धा तो आयपीएल खेळत आहे, यावरुन त्याने हे सिद्ध केले आहे की तो मैदानात इतर खेळाडूंच्या फिटनेसला टक्कर देवू शकतो.

चेन्नईचा दणदणीत विजय

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईने टाॅस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकात २०६ धावा केल्या. ऋतुराज गायकवाड (६९) आणि शिवम दूबे (६६) यांनी अर्धशतकीय खेळी खेळल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्माने शतक ठोकत १०५ धावा केल्या, परंतु संघाला २० षटकात केवळ १८६ धावा करता आल्या आणि मुंबई संघ २० धावांनी हरला.

या सामन्यानंतर चेन्नई पाॅईंट टेबलमध्ये आपल्या ४ विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच मुंबई पाॅईंट टेबलमध्ये आपल्या दोन विजयांसह आठव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स आपला पुढचा सामना १८ एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध खेळणार आहे तर चेन्नईची पुढची लढत १९ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Monthha : चक्रीवादळ ‘मोंथा’ धडकणार! ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा; लष्करी तुकड्याही 'अलर्ट मोड'वर

Bacchu Kadu: मंगळवारी नागपुरात महाएल्गार मोर्चा; मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा बच्चू कडू यांचा प्रयत्न

Daily Walking Health: रोज चालण्याने 'हे' 5 आजार होणार छूमंतर, पोषणतज्ज्ञ सोनिया नारंग यांचा खास व्हिडिओ पाहा

Latest Marathi News Live Update : इंदापूरमध्ये राजकीय भूकंप! हर्षवर्धन पाटील यांचे तीन शिलेदार भरणे गोटात जाणार

Pro Kabaddi 12: यू मुंबावर पटना पायरेट्सचा दणदणीत! आता एलिमिनेटर १ मध्ये जयपूर पिंक पँथर्सला भिडणार

SCROLL FOR NEXT