IPL 2024 Points Table Sakal
IPL

IPL 2024, Points-Table: पंजाबविरुद्ध विजयाने मुंबईला फायदा, पाँइंट्स-टेबलमध्ये घेतली उडी; जाणून घ्या संघांच्या क्रमवारी

PBKS vs MI, IPL 2024: पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सला पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे.

Pranali Kodre

IPL 2024, Points-Table: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात 33 वा सामना गुरुवारी (18 एप्रिल) झाला. मुल्लनपूर येथे झालेल्या या सामन्यात मुंबईने 9 धावांनी विजय मिळवला. मुंबईच्या या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाला.

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील मुंबईचा हा सात सामन्यांमधील तिसरा विजय आहे. त्यामुळे आता त्यांचे 6 गुण झाले आहेत. त्याचमुळे त्यांनी आता गुणतालिकेत गुजरात टायटन्सला मागे टाकून सातवा क्रमांक मिळवला आहे.

गुजरात टायटन्सनेही सात पैकी तीन सामने जिंकले असून त्यांचेही 6 गुण आहेत. परंतु, मुंबईचा नेट रन रेट गुजरातपेक्षा चांगला आहे.

याशिवाय दिल्ली कॅपिटल्सनेही सात पैकी तीन विजय मिळवले आहे, तर लखनौ सुपर जायंट्सने सहा पैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचेही 6 गुण आहेत. परंतु, नेट रन रेटच्या फरकामुळे लखनौ पाचव्या क्रमांकावर आणि दिल्ली सहाव्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान, पंजाबला मुंबईविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्याने नुकसान झाले आहे. पंजाब आता थेट नवव्या क्रमांकावर घसरले आहेत. पंजाबने सात सामन्यांपैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचे केवळ 4 गुण आहेत.

त्यांच्याखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आहेत. बेंगळुरूला सात सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे त्यांचे केवळ 2 गुणच आहेत.

गुणतालिकेतील पहिल्या चार क्रमांकांबद्दल सांगायचे झाले, तर राजस्थान रॉयल्स संघ सात सामन्यांतील सहा विजय मिळून 12 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.

तसेच दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स, तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स आणि चौथ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद संघ आहे.

या तिन्ही संघांनी सहा सामन्यांतील चार सामन्यात विजय मिळवले आहेत. त्यामुळे या तिन्ही संघांचे 8 गुण आहेत. परंतु, नेट रन रेटच्या फरकामुळे त्यांचे स्थान निश्चित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT