IPL 2024 Playoffs Scenario sakal
IPL

IPL 2024 Playoffs Scenario : शर्यत झाली रोमांचक! 55 सामने खेळले 9 संघ उरले... पण एकही टीम झाली नाही प्लेऑफसाठी पात्र

IPL 2024 Playoffs Scenario : आयपीएल 2024 मध्ये 55 सामने खेळले गेले आहेत परंतु आतापर्यंत एकही संघ या हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही

Kiran Mahanavar

IPL 2024 Playoffs Scenario : आयपीएल 2024 मध्ये 55 सामने खेळले गेले आहेत परंतु आतापर्यंत एकही संघ या हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. जर आपण पॉइंट टेबलमधील टॉप-4 संघांबद्दल बोललो, तर कोलकाता नाइट रायडर्स 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, परंतु हा संघ अद्याप प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही.

याशिवाय राजस्थान रॉयल्स 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर, चेन्नई 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आणि हैदराबाद 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. केकेआर आणि राजस्थान प्लेऑफमध्ये जाणार हे जवळपास निश्चित आहे. पण हे दोन्ही संघ अद्याप पूर्णपणे पोहोचलेले नाहीत.

15 सामने बाकी, 9 संघ शर्यतीत

आयपीएल 2024 चा हा हंगामान आश्चर्यकारक आहे. या हंगामात सर्वाधिक 200+ धावा, सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक शतके झाली आहेत. आणि अर्ध्याहून अधिक हंगाम संपल्यानंतरही एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकलेला नाही. आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.

आता या हंगामात 15 साखळी सामने बाकी आहेत आणि 9 संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. मुंबई इंडियन्स हा एक संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. पण आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स सारखे संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेले नाहीत.

यंदाच्या मोसमात संजू सॅमसनचा संघ राजस्थान रॉयल्स जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. आतापर्यंत राजस्थानने सर्वात कमी सामने गमावले आहेत. राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 मध्ये 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 8 जिंकले आहेत आणि फक्त 2 सामने गमावले आहेत. राजस्थान आणि केकेआरचे 16-16 गुण आहेत पण चांगल्या नेट रनरेटमुळे केकेआर पहिल्या क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर केकेआरने राजस्थानपेक्षा एक सामना जास्त खेळला आहे. आता इथून राजस्थानने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा पुढचा सामना जिंकला तर तो प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनेल. राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी आज म्हणजेच 7 मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा भायखळ्याच्या क्लेअर रोडला पोहचला

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

SCROLL FOR NEXT