RCB , RR , KKR, SRH Sakal
IPL

IPL 2024 Playoffs: कोलकाता-राजस्थान सामना रद्द होताच प्लेऑफच्या शेड्युलवर शिक्कामोर्तब; कोणाचा सामना कोणाविरुद्ध, घ्या जाणून

IPL 2024 Playoffs Shedule: आयपीएल 2024 मधील सर्व साखळी सामने संपले असून प्लेऑफमध्ये कोणता संघ कोणाविरुद्ध सामना खेळणार आहे, हे देखील निश्चित झाले आहे.

Pranali Kodre

IPL 2024 Playoffs Schedule: आयपीएल 2024 मधील अखेरचा साखळी सामना गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात रविवारी (19 मे) होणार होता. मात्र गुवाहाटीत झालेल्या पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला.

हा सामना पाँइंट्स टेबलमधील दुसरा आणि तिसऱ्या क्रमांक ठरवण्यासाठी महत्त्वाचा होता. पण अखेर हा सामना रद्द झाल्याने पाँइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कोणत्या क्रमांकावर राहिला, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सामना रद्द झाल्याने राजस्थान तिसऱ्या, तर सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

त्याचबरोबर यामुळे प्लेऑफमध्ये कोणता संघ कोणाविरुद्ध सामना खेळणार आहे, हे देखील निश्चित झाले आहे.

प्लेऑफमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू चार संघांनी प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला आहे.

प्लेऑफमधील संघांची कामगिरी आणि स्थान

पाँइंट्स टेबलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 14 सामन्यांतील 9 विजय आणि तीन पराभव, तसेच 2 अनिर्णित सामने यासह 20 गुणांसह अव्वल क्रमांक काबीज केला. तसेच सनरायझर्स हैदराबादने 14 सामन्यांतील 8 विजय, 5 पराभव आणि आणि 1 अनिर्णत सामन्यासह 17 पाँइंट्ससह दुसरा क्रमांक मिळवला आहे.

खरंतर राजस्थानला कोलकाताला पराभूत करत दुसरा क्रमांक मिळवण्याची संधी होती. मात्र सामना रद्द झाल्याने आता राजस्थानचे 14 सामन्यांतील 8 विजय, 5 पराभव आणि आणि 1 अनिर्णत सामन्यासह 17 पाँइंट्स झाले आहेत.

दरम्यान हैदराबादचा नेट रन रेट राजस्थानपेक्षा चांगला असल्याने त्यांनी दुसरा क्रमांक, तर राजस्थानला तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले आहे.

तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून 14 सामन्यांतील 7 विजय आणि 7 पराभवासह 14 गुण मिळवत चौथा क्रमांक मिळवला आहे.

प्लेऑफमधील सामने आणि स्वरुप

आता पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहिलेले कोलकाता आणि हैदराबाद संघ प्लेऑफमध्ये पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये आमने-सामने असतील. तसेच पाँइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहणारे राजस्थान आणि बेंगळुरू हे संघ एलिमिनेटर सामना खेळतील.

पहिला क्वालिफायर सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात जाईल, तर पराभूत संघाला दुसरा क्वालिफायर सामना खेळण्याची संधी असेल. एलिमिनेट सामन्यात पराभूक होणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपेल, तर जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळेल. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पोहचेल.

प्लेऑफमधील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता चालू होणार आहेत.

आयपीएल 2024 प्लेऑफचे वेळापत्रक-

  • 21 मे - क्वालिफायर - 1 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद अहमदाबाद

  • 22 मे - एलिमिनेटर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, अहमदाबाद

  • 24 मे - क्वालिफायर - 2 : क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरमधील विजेता संघ, चेन्नई

  • 26 मे - अंतिम सामना - क्वालिफायर 1 मधील विजेता संघ विरुद्ध क्वालिफायर 2 मधील विजेता संघ, चेन्नई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधीपासूनच हिंदीत होतेय K DRAMAची कॉपी ! माणिक-नंदिनीची गाजलेली मालिका आहे 'या' सिरीजवर आधारित

Latest Marathi News Live Update: प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Mappls : हायवेवर सिक्रेट स्पीड कॅमेरा कुठं आहे? गुगल मॅपपेक्षा भारी आहे 'हे' भारतीय App, जाणून घ्या महत्त्वाचं फीचर

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेतून ३ कोटींच्या सोन्याची बॅग लंपास; बडनेरा रेल्वे स्थानकावर सराफा व्यावसायिकाला मोठा धक्का

Dhule Zilla Parishad : धुळे जि. प. अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव! ५६ गटांची आरक्षण सोडत जाहीर, २८ जागांवर महिलांना संधी

SCROLL FOR NEXT