rohit sharma on hardik pandya srh vs mi ipl 2024 News Marathi
rohit sharma on hardik pandya srh vs mi ipl 2024 News Marathi  sakal
IPL

SRH Vs MI : मुंबईच्या पराभवानंतर रोहित शर्माने सर्वांसमोर घेतली कर्णधार हार्दिक पांड्याची शाळा...

Kiran Mahanavar

Mumbai loss against Sunrisers Hyderabad : आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हैदराबादविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादने मुंबईचा 31 धावांनी पराभव केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव आहे.

मुंबईच्या या पराभवानंतर चाहते हार्दिक पांड्याला ट्रोल करत आहे. आणि दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मानेही सामन्यानंतर हार्दिकला फटकारले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्या सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. एमआयला याआधी गुजरातविरुद्ध 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर आता हैदराबादविरुद्ध 31 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

या पराभवानंतर मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यावर भडकला आहे. सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आकाश अंबानीशी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिलक वर्मासह तिथे अन्य खेळाडू पण उपस्थित होते. आणि रोहित शर्मा हार्दिक पांड्याला समजावून सांगत आहे.

यावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, सामन्यादरम्यान हार्दिक कोणाचेही ऐकत नाही. त्यामुळेच मुंबईने सलग 2 सामने गमावले आहेत. याच कारणामुळे सामन्यानंतर रोहित शर्मा हार्दिकला सामन्यादरम्यान झालेल्या चुका सांगत आहे.

पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध मुंबईचा पराभव झाला, तेव्हाही रोहित शर्मा हार्दिकला समजावताना दिसला. आता पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळत आहे.

मुंबई आणि हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी धावांची त्सुनामी आणली होती. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने अवघ्या 3 गडी गमावून 277 धावा केल्या. ही धावसंख्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे.

हैदराबादच्या चार फलंदाजांनी झंझावाती खेळी खेळली, त्यामुळे ही धावसंख्या शक्य झाली. लक्ष्य मोठे असले तरी मुंबई इंडियन्सने हार मानली नाही. मुंबईनेही सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र मुंबईला हा सामना जिंकता आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार; देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल

Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

KL Rahul : हे तर पेल्यातलं वादळ... केएल अन् गोयंका वादावर लखनौच्या कोचला नेमकं काय म्हणायचंय?

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 3 जणांना मृत्यू; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

SCROLL FOR NEXT