IPL 2024 Schedule Marathi News 
IPL

IPL 2024 Schedule : टीम इंडियाची घोडी पुन्हा दमणार... वर्ल्ड कपच्या फक्त 5 दिवस आधी आयपीएल संपणार?

Kiran Mahanavar

IPL 2024 Schedule : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे वेळापत्रक लवकरच जाहीर केल्या जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2024 चा थरार 22 मार्चपासून सुरु होण्याची शक्यता आहे. आयपीएल संपल्यानंतर 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. याच्या पाच दिवस आधी म्हणजे 26 मे रोजी आयपीएल संपुष्टात येऊ शकते.

लोकसभेच्या निवडणुकाही याच वर्षी मार्च-एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. यादरम्यान आयपीएलचे सामनेही होणार आहेत. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलचे सामने भारतात होणार की परदेशात हे अद्याप ठरलेले नाही. अहवालानुसार, सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेनंतरच त्याचा निर्णय घेतला जाईल. गेल्या दोन प्रसंगी जेव्हा भारतात सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा आयपीएल एकतर परदेशात खेळवले गेले किंवा त्याचे काही सामने परदेशात आणि काही भारतात झाले.

टी-20 वर्ल्डकप 1 जूनपासून सुरू होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या 16 संघांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात 1 जून रोजी म्हणजेच आयपीएल फायनलच्या 4 दिवसांनी खेळवला जाईल. आयपीएलच्या नऊ दिवसांनंतर भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना 5 जून रोजी खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची पळापळी होणार हे निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT