IPL 2024 Disney star Viewership Record esakal
IPL

IPL 2024 Viewership Record : डिस्ने स्टारला छप्पर फाड के प्रतिसाद; तब्बल 35 कोटी चाहत्यांनी पाहिली आयपीएल

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Viewership Record : इंडियन प्रीमियरल लीगने यंदाच्या हंगामात सर्वच बाबतीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या देखील याच हंगामात झाली अन् ब्रॉडकास्ट व्ह्युवरशिपच्या बाबतीत देखील रेकॉर्ड ब्रेक याच हंगामात झालं आहे. आयपीएलच्या पहिल्या 10 सामन्यात डिस्ने स्टारची प्रेक्षक संख्या ही 35 कोटींच्या घरात पोहचली आहे.

याचबरोबर एकूण वॉच टाईम देखील यंदाच्या हंगामात वाढला आहे. यंदाच्या हंगामात वॉच टाईममध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी आयपीएल 2024 च्या पहिल्या 10 सामन्यांची आहे.

डिस्ने स्टारचे स्पोर्ट्स हेड संजोग गुप्ता यांनी सांगितले की, 'आम्हाला टाटा आपीएल 2024 च्या रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक संख्येचे आकडे पाहून आनंद होत आहे. डिस्नेने गेल्या वर्षीचा हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. चाहत्यांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम केलं.'

ते पुढे म्हणाले की, 'स्टार स्पोर्ट्सवरप्रेमाणे आम्हाला देखील चाहत्यांचा खंबीर पाठिंबा अन् प्रेम मिळालं. यामुळे आयपीएलची एकूण क्षमता याचबरोबर टीव्हीवरली त्यांची भविष्यातील वाढ याबाबत देखील एक विश्वासाचं वातावरण तयार झालं आहे. याचबरोबर वाढलेली आकडेवारी ही चाहत्यांना एक उत्तम अनुभव देण्याच्या आमच्या प्रयत्नांना मिळलेलं यश दर्शवतं. आम्ही ब्रॉडकास्टिंगमध्ये नाविण्यपूर्ण प्रयोग केले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात; चार वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT