Asia Cricket Cup 2023 sakal
IPL

Asia Cricket Cup 2023 : आशिया क्रिकेट कप स्पर्धेचा निर्णय रविवारी; अहमदाबादमध्ये आशियाई परिषदेची बैठक

आशिया करंडक स्पर्धा कोणत्या देशात होणार याचा अंतिम निर्णय अद्याप तरी झालेला नाही. आम्ही आयपीएलमध्ये व्यस्त आहोत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - बहुचर्चित आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात खेळवायची याचा निर्णय रविवारी होण्याची शक्यता आहे.

आयपीएल अंतिम सामन्याच्या निमित्ताने आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या सदस्यांची बैठक रविवारी होणार असल्याचे कौन्सिलचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे.

आशिया करंडक स्पर्धा कोणत्या देशात होणार याचा अंतिम निर्णय अद्याप तरी झालेला नाही. आम्ही आयपीएलमध्ये व्यस्त आहोत.

आयपीएलचा अंतिम सामना पाहाण्यास बांगलादेश श्रीलंका आणि अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख पदाधिकारी अहमदाबादमध्ये येणार आहेत. त्यांच्याबरोबर बैठक होईल आणि त्यात हा निर्णय घेण्यात येईल, असे शहा यांनी म्हटले आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही आशिया करंडक स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती; परंतु भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास जाणार नसल्यामुळे पाक मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी `हॅब्रिड मॉडेल` भारत आणि पाकचे साखळी सामने वेगवेगळ्या देशात खेळण्याचा प्रस्ताव ठेवला.

भारताचे सामने दुबईत तर बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान यांचे साखळी सामने पाकमध्ये खेळवण्याचा हा प्रस्ताव होता,

परंतु अशा वेगवेगळ्या यजमानपदासाठी भारताने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे ही स्पर्धा पाकमधून हलवणे भाग पडले. स्पर्धेचे ठिकाण निश्चित झालेले नसले तरी स्पर्धेचा कालावधी आणि गटवारी जय शहा यांनी अगोदरच जाहीर केली आहे.

त्यानुसार १ ते १७ सप्टेंबर या कालावधीत स्पर्धा होणार आहे. सहा संघांच्या या स्पर्धेत भारत, पाक, नेपाळ एका गटात, तर दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT