IPL Auction 2024 Expensive Players  esakal
IPL

IPL Auction : विक्रम मोडणारा IPL 2024 लिलाव! 'हे' आहेत टॉप 10 सर्वात जास्त कमाई करणारे खेळाडू

मिचेल स्टार्कची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटींना विकत घेतले. याच लिलावात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले.

Kiran Mahanavar

IPL Auction 2024 Expensive Players : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

मिचेल स्टार्कची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटींना विकत घेतले. याच लिलावात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. स्टार्कने आपल्या संघाच्या कर्णधाराचा विक्रम मोडला.

स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरुवातीला चुरशीची स्पर्धा पाहिला मिळाली. 9.40 कोटींची बोली लावल्यानंतर दिल्ली तेथे थांबली. तर मुंबई संघाने सर्वाधिक 9.60 कोटी रुपयांची बोली लावली.

येथून गुजरात आणि कोलकाता यांच्यात सामना पाहायला मिळाला. गौतम गंभीर कोलकात्याच्या टेबलावर तर आशिष नेहरा गुजरातच्या टेबलावर बसला होता. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजासाठी भारताच्या दोन माजी खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. शेवटी गंभीरने बाजी मारली.

कमिन्सने सॅम करनचा मोडला विक्रम

कमिन्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूसाठी 20 कोटी रुपयांची बोली लागली. सनरायझर्सने 20 कोटींची बोली ओलांडली.

शेवटी सनरायझर्स हैदराबादने कमिन्सला विकत घेतले. कमिन्सने लिलावात सर्वाधिक किंमत मिळवण्याच्या बाबतीत इंग्लंडच्या सॅम करनचा विक्रम मोडला. करणला गेल्या वर्षी पंजाबने 18.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

या आयपीएल लिलावातील टॉप-10 सर्वात महागडे खेळाडू :

  1. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. कोलकाता आणि गुजरात टायटन्स यांच्यात स्टार्कसाठी जोरदार बोली लागली. शेवटी कोलकाता जिंकला.

  2. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. कमिन्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात त्याच्यासाठी जोरदार बोली लागली होती. शेवटी सनरायझर्सने बाजी मारली.

  3. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटींना विकत घेतले. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.

  4. भारताच्या हर्षल पटेलला पंजाब किंग्जने 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

  5. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 11.50 कोटी रुपयांना विकत घेतले.

  6. भारताचा अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवीला चेन्नई सुपर किंग्जने 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

  7. गुजरात टायटन्सने तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू शाहरुख खानला 7.40 कोटी रुपयांना विकत घेतले. शाहरुखची मूळ किंमत 40 लाख रुपये होती.

  8. पॉवेलची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. त्याला राजस्थान रॉयल्सने 7.40 कोटी रुपयांना विकत घेतले.

  9. झारखंडचा यष्टिरक्षक-फलंदाज कुमार कुशाग्राला दिल्ली कॅपिटल्सने 7.20 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

  10. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याला सनरायझर्स हैदराबादने 6.80 कोटी रुपयांना विकत घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT