IPL 2021 
IPL

IPL Record In UAE : हाफ स्पर्धेत MI तर फुल स्पर्धेत CSK चे वाजलेत बारा!

आयपीएलची स्पर्धा परदेशात घेण्याची ही तशी चौथी वेळ असून सर्वात पहिल्यांदा 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेतही स्पर्धा पार पडली होती.

सुशांत जाधव

IPL Record In UAE : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने पुन्हा एकदा युएईला स्थलांतरित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली. 19 सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील दुबईतील मैदानातील लढतीने दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात होणार आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे मागील वर्षी संपूर्ण स्पर्धा युएईच्या मैदानात पार पडली होती. त्यानंतर 14 व्या हंगामात पुन्हा बीसीसीआयने घरच्या मैदानात स्पर्धा खेळवण्याचा केलेला प्रयत्न केला. पण घरच्या मैदानात 'बायो-बबल'चा फुगा फुटल्यानंतर पुन्हा स्पर्धा युएईला स्थलांतरित करण्याची वेळ आली. त्यामुळे आता आयपीएलचा यंदाचा विजेताही आपल्याला परदेशातच मिळेल.

आयपीएलची स्पर्धा परदेशात घेण्याची ही तशी चौथी वेळ आहे. सर्वात पहिल्यांदा 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत संपूर्ण स्पर्धा घेण्यात आली होती. युएईचा विचार केला तर 2014 मध्ये पहिल्यांदा निम्मी स्पर्धा युएईच्या मैदानात खेळवण्यात आली होती. देशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता कोरोनामुळे निम्मी स्पर्धा युएईत पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये आयपीएलच्या 13 व्या हंगामातील संपूर्ण स्पर्धा युएईत झाली होती.

युएईतील हाफ आणि फुल स्पर्धेतील अनोखा विक्रम

2014 मध्ये आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामने युएईच्या मैदानात खेळवण्यात आले. यावेळी मुंबई इंडियन्सची चांगलीच गोची झाल्याचे पाहायला मिळाले होते. मुंबई इंडियन्सला त्यावेळी 5 पैकी एकाही सामन्यात यश मिळाले नव्हते. याच हंगामातील भारतात रंगलेल्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दमदार कमबॅक करत एलिमेटरपर्यंत प्रवेश केला. पण चेन्नई सुपर किंग्जने त्यांना स्पर्धेतून बाद केले होते. म्हणजेच निम्मी स्पर्धा युएईत खेळताना मुंबईची अवस्था बिकट झाल्याचा इतिहास आहे. मागील वर्षी संपूर्ण स्पर्धा ज्यावेळी युएईत झाली त्यावेळी मात्र मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरले होते.

ज्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी केविलवाणी होती त्यावळी पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत चेन्नईने दमदार कामगिरी करुन दाखवली होती. त्यांनी 5 पैकी 4 सामने जिंकले होते. याउलट मागील वर्षी युएईच्या मैदानात संपूर्ण स्पर्धा झाली त्यावेळी चेन्नईला प्ले ऑफपर्यंतही मजल मारता आली नव्हती. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ तळाला दिसला होता.

2014 मध्ये झालेल्या निम्म्या स्पर्धेतील इतर संघाचे रेकॉर्ड

किंग्ज इलेव्हन पंजाब सध्याच्या पंजाब किंग्ज 5 पैकी 5 सामने जिंकले

  • चेन्नई सुपर किंग्ज 5 पैकी 4 विजय आणि एक पराभव

  • राजस्थान रॉयल्स 5 पैकी 3 विजय आणि 2 पराभव

  • कोलकाता नाईट रायडर्स 5 पैकी 2 विजय 3 पराभव

  • दिल्ली डेअरडेव्हिल्स सध्याची दिल्ली कॅपिटल्स 5 पैकी 2 विजय 3 पराभव

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 5 पैकी 2 विजय 3 पराभव

  • सनरायझर्स हैदराबाद 5 पैकी 2 विजय 3 पराभव

  • मुंबई इंडियन्स 5 पैकी एकही सामना जिंकता आला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

Acute Encephalitis Syndrome: उपराजधानीला मेंदूज्वराचा धोका; शहरात आढळले ८ रुग्ण, मनपाच्या रूग्णालयात उपचाराच्या यंत्रणेचा अभाव

Pune Navratra Mahotsav : ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’मध्ये कला, संस्कृती, गायनाचा संगम; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्‍घाटन

SIP Tips: SIP मध्ये रोज 100 रुपये की महिन्याला 3000 रुपये गुंतवणूक करावी? कुठे होतो जास्त फायदा?

SCROLL FOR NEXT