Mahendra Singh Dhoni CSK IPL News sakal
IPL

CSK IPL News: स्टोक्सच्या पुनरागमनाचा चेन्नईला दिलासा

धोनीची सेना घरच्या मैदानावर चौथ्या विजयासाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ उद्या आयपीएलमधील लढतीत सनरायझर्स हैदराबादशी दोन हात करणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा संघ ही लढत घरच्या मैदानावर खेळणार असून, अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या पुनरागमनामुळे त्यांच्या संघाचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला असेल.

याप्रसंगी धोनीची सेना चौथ्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करील. या लढतीसाठी चेन्नई सुपर किंग्सचे पारडे जड असले तरी सनरायझर्स हैदराबादचा संघ तिसऱ्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहे.

चेन्नईच्या संघाने १७ एप्रिल रोजी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध ८ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयामुळे चेन्नईचा संघ उद्याच्या लढतीत आत्मविश्‍वासानेच मैदानात उतरेल. चेन्नईचे डेव्होन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे हे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. (Latest Sport News)

बेन स्टोक्सच्या समावेशामुळे चेन्नईची मधली फळी आणखी मजबूत होणार आहे. रवींद्र जडेजा, मोईन अली यांच्याकडून अष्टपैलू कामगिरीची आशा बाळगली जात आहे. महेंद्रसिंह धोनीची फलंदाजी बघण्यासाठी आजही स्टेडियममध्ये क्रिकेटप्रेमी गर्दी करताना दिसत आहेत.

चेन्नईचा फलंदाजी विभाग मजबूत असला तरी गोलंदाजी विभागात त्यांच्याकडून सातत्याचा अभाव दिसून येत आहे. तसेच क्षेत्ररक्षणातही सुमार कामगिरी होत आहे. झेल सोडण्यात येत आहेत. मथिशा पथिरना याने बंगळूरविरुद्धच्या लढतीत प्रभावी कामगिरी केली.

तुषार देशपांडेच्या कामगिरीतही सुधारणा होताना दिसत आहे. तरीही चेन्नईच्या गोलंदाजी विभागाला आपला खेळ उंचवावा लागणार आहे. रवींद्र जडेजा, मोईन अली व माहीश तीक्षणा या फिरकी गोलंदाजांना प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखावे लागणार आहे.

इतिहास यजमानांच्या बाजूने

चेन्नई- हैदराबादमधील मागील पाच लढतींच्या निकालावर नजर टाकल्यास चेन्नईचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. चेन्नई-हैदराबादमधील लढत चेन्नईत होणार आहे. या दोन संघांमध्ये झालेल्या मागील पाच लढतींपैकी चारमध्ये चेन्नईने बाजी मारली आहे.

आजची लढत

चेन्नई सुपर किंग्स - सनरायझर्स हैदराबाद

वेळ - संध्याकाळी ७.३० वा.

स्थळ - चेन्नई

प्रक्षेपण- स्टार स्पोर्टस्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT