IPL players salary structure how much actual amount of salary players get
IPL players salary structure how much actual amount of salary players get  esakal
IPL

IPL मधील बोलीपैकी किती रक्कम खेळाडूला मिळते?

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल 2022 चा लिलाव (IPL 2022 Auction) नुकताच बंगळुरूमध्ये पार पडला. या लिलावात अनेक कॅप्ड अनकॅप्ड खेळाडूंना फ्रेंचायजींनी कोटीच्या घरातील रक्कम चुकवून आपल्या संघात घेतले. यातील काही खेळाडूंनी तर विशी देखील पार केलेली नाही. काही खेळाडूंना कोट्यावधी रूपये मिळतील असे कोणलाही वाटले नव्हते. दरम्यान आयपीएल लिलावातील (IPL Auction 2022) होणाऱ्या कोट्यावधींच्या खेळावर तुमच्या माझ्या सारख्या सामन्य (अतिसामान्य) लोकांना यावर विश्वासच बसत नाही. आपल्या मनात याबाबत अनेक शंका असतात. खरंच खेळाडूंनाच हा सगळा पैसा (IPL Players Salary) मिळतो का? यापैकी किती पैसे कोण कापून घेतो? या लिलावावर कर लागू होतो का? हे पैसे किती हंगामासाठी मिळतात? असे अनेक प्रश्न आपल्या पडतात. अशाच आयपीएलमधून खेळाडूंना बोलीच्या स्वरूपात मिळणाऱ्या पैशाबाबतच्या शंका 10 मुद्यात दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

आयपीएल पगाराचे स्वरूप आणि त्याबाबतचे 10 मुद्दे (IPL Players Salary Structure)

  • आयपीएल लिलावात जी काही बोली खेळाडूला लागते ती सगळी बोली ही त्या खेळाडूलाच मिळते. यावर लागणारा कर कापून घेतला जातो.

  • लिलावात मिळालेल्या पैशावर अजून कोणीही दावा करू शकत नाही. ती संपूर्ण रक्कम खेळाडूचीच असते.

  • विशेष म्हणजे लागलेली ही बोली एका हंगामाची असते. जर समजा खेळाडूला 15 कोटी रूपये बोली लागली तर ती बोली ही एका हंगामापुरती असते. जर फ्रेंचायजी आणि खेळाडूमध्ये तीन वर्षाचा करार झाला तर फ्रेंचायजीला खेळाडूला तीन हंगामचे असे 45 कोटी रूपये द्यावे लागतात.

  • आयपीएल सुरू झालेल्या वर्षी म्हणजे 2008 ते 2012 पर्यंत खेळाडूंना लागलेली बोली ही अमेरिकी डॉलरमध्ये दिली जायची. त्यावेळी एक्सचेंज रेट 40 रूपये प्रती डॉलर निश्चित केला गेला होता. मात्र 2012 मध्ये भारतीय रूपयात बोलीची रक्कम देण्याची पद्धत सुरू झाली.

  • जर एखाद्या फ्रेंचायजीने एखाद्या खेळाडूबरोबर तीन वर्षाचा करार केला. मात्र तीन वर्षानंतर लिलाव होणार नसेल आणि फ्रेंचायजीला खेळाडू रिटेन करायचा असेल तर हा तीन वर्षाचा करार पुढच्या हंगामासाठी वाढवून घेता येतो. हा करार आहे त्या पगारावर पुढे वाढवून घेता योते. मात्र यात व्यक्ती व्यक्तीनुसार याचे स्वरूप बदलते. जर संघ खेळाडूला पगार वाढवून देणार असले तर ते तसं करू शकतात. सहसा करार हा पगारवाढीसहच वाढवून घेतला जातो.

  • जर एखादा खेळाडू संपूर्ण हंगाम खेळला तर त्याला पूर्ण बोलीची पूर्ण रक्कम मिळते. मात्र हे गणित तो खेळाडू किती सामने खेळतो आणि किती सामन्यासाठी निवडला जातो याच्यावर अवलंबून आहे.

  • एखादा खेळाडू हंगाम सुरू होण्यापूर्वी दुखापतग्रस्त झाल्यास तर फ्रेंचायजीला त्या खेळाडूला हंगामाचे पैसे देण्याची गरज नसते. जर एखादा खेळाडू हंगामातील काही सामनेच उपलब्ध असेल तर त्याला त्याच्या उपलब्धतेनुसार वेतन दिले जाते.

  • मात्र एखादा खेळाडू स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला तर त्याचा वैद्यकीय खर्च फ्रेंचायजीला करावा लागतो.

  • खेळाडूला आपला फ्रेंचायजीबरोबरचा करार संपण्यापूर्वीच करारातून बाहेर पडायचे असेल तर तो तशी परवानगी फ्रेंचायजीकडे मागू शकतो. जर फ्रेंचायजीने खेळाडूला करार संपण्यापूर्वी रिलीज केले त्या खेळाडूला ठरल्या प्रमाणे त्या हंगामाची संपूर्ण रक्क द्यावी लागते.

  • सगळ्याच फ्रेंचायजी खेळाडूंना एक रक्कमी पगार देत नाहीत. ती फ्रेंचायजी किती श्रीमंत आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे. काही फ्रेंचायजी त्या खेळाडूला एकरक्कमी पगार देतात. काही श्रीमंत फ्रेंचायजी खेळाडूंना आपल्या पहिल्या सरावसत्रावेळी चेक देतात. काही फ्रेंचायजी पगाराची अर्धी रक्कम स्पर्धेआधी आणि अर्धी रक्कम स्पर्धेदरम्यान देतात. काही फ्रेंचायजी 15-65-20 टक्के अशा तीन टप्प्यात खेळाडूची रक्कम देतात. या फॉर्मुल्यानुसार फ्रेंचायजी 15 टक्के रक्कम ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक आठवडा देतात. 65 टक्के रक्कम स्पर्धा सुरू असताना आणि 20 टक्के रक्कम स्पर्धा संपल्यानंतर देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर; वाचा नव्या अभ्यासात काय काय आढळले

Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

Latest Marathi News Live Update: शिवाजी पार्कमध्ये मोदींचे कटआऊट हटवले, भाजप कार्यकर्ते संतप्त

SCROLL FOR NEXT