Country Cricket IPL vs PSL Clash ESAKAL
IPL

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

अनिरुद्ध संकपाळ

Country Cricket IPL vs PSL Clash : इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगचे 2025 चे हंगाम हे क्लॅश होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनामुळं पीसीबीला पाकिस्तान सुपर लीग चा हंगाम आयपीएलच्या स्लॉटवेळीच घ्यावा लागणार आहे. पीसीबीने फ्रेंचायजींचा दबाव झुगारून याच आयपीएलवेळीच पीएसएल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील या भांडणामुळं तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे धाबे दणाणले आहेत.

पाकिस्तान सुपर लीग 2025 ची सुरूवात ही 7 एप्रिल पासून होईल. ही स्पर्दा 20 मे पर्यंत चालणार आहे. त्यांनी आयपीएल स्लॉटमध्येच आपली स्पर्धा भरवण्याचा निर्णय घेतला आहे. सहसा पीएसएलचा हंगाम हा फेब्रुवारी महिन्यात होतो. मात्र आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमुळं त्यांना आपल्या शेड्युलमध्ये बदल करावा लागला आहे.

इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही लीगमध्ये चांगली डिमांड असते. गेल्या तीन वर्षापासून इंग्लंडच्या खेळाडूंचा ओढा आयपीएल आणि पीएसएलकडे वाढला आहे. आता पीएसएल आणि आयपीएलच्या क्लॅशमध्ये काऊंटी क्रिकेटचं मोठं नुकसार होणार आहे. या दोन क्रिकेट लीगचा थेट क्लॅश हा काऊंटी क्रिकेटच्या सुरूवातीच्या दोन महिन्यांवर होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि इस्लामाबाद युनायटेडशी संबंधीत असलेले बेन जोन्स हे टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, 'जगभरात इंग्लंडच्या खेळाडूंची मोठी डिमांड असते. आयपीएल आणि पीएसएलमध्ये किमान 30 इंग्लिश खेळाडू खेळतात. त्यांनी 2025 साठी या दोन लीगचे करार साईन केले आहेत.

गेल्या 3 वर्षात एकूण 45 इंग्लिश क्रिकेटपटूंनी आयपीएल आणि पीएसएलमध्ये सहभाग नोंदवला आहे. आता इंग्लंड क्रिकेट बोर्ड काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल. जे खेळाडू विदेशातील टी 20 लीग खेळतात त्यांना इसीबीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral video: लाइव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये ‘तो’ क्षण पकडला, पाकिस्तानी जनरलने महिलेसोबत नेमकं काय केलं? व्हिडिओ व्हायरल

ITR Refund Delay : ITR रिफंडला का लागत आहे उशीर? खरं कारण काय अन् कधी मिळणार पैसे..सगळं जाणून घ्या एका क्लिकवर

VIDEO : युट्यूबरने गाईला खायला घातले चिकन मोमोज; हिंदू संघटना-गोरक्षक आक्रमक, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

शत्रुघ्न सिन्हा Vs जया बच्चन! 'तुम्ही खुप चांगल्या पँन्ट, शर्ट घालतात, मला फार आवडतात' अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

Hapus Mango : गुजराती आंब्याला हापूसचा दर्जा? कोकणी हापूस अस्तित्वावरून अधिवेशनात भास्कर जाधव आक्रमक, कोकणी मंत्र्यांची खरडपट्टी

SCROLL FOR NEXT