ipl today match 2022 mi vs kkr  sakal
IPL

कोलकतासमोर मुंबईचे आव्हान; नवी मुंबईत आज रंगणार लढत

मुंबई इंडियन्सचे आव्हान याआधीच संपुष्टात आले असून कोलकता नाईट रायडर्सचे आव्हानही संपल्यात जमा

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2022 MI vs KKR : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील दोन खालच्या क्रमांकावरील संघांमध्ये आज लढत रंगणार आहे. मुंबई इंडियन्स-कोलकता नाईट रायडर्स हे संघ नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मुंबई इंडियन्सचे आव्हान याआधीच संपुष्टात आले असून कोलकता नाईट रायडर्सचे आव्हानही संपल्यात जमा आहे. त्यामुळे या लढतीच्या निकालाचा प्ले ऑफ लढतींवर परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे.(IPL Today Match 2022 MI vs KKR)

सर्वाधिक पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईला यंदाच्या मोसमात सूर गवसला नाही. पहिल्या आठ लढतींमध्ये या संघाला हार सहन करावी लागली. त्यामुळे साहजिकच त्यांचा स्पर्धेतील खेळ त्यावेळीच खल्लास झाला. या संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाही. उर्वरित लढतींमध्ये त्यांना प्रतिष्ठा राखायची आहे. या संघाने मागील दोन लढतींत विजय मिळवला आहे. याचा अर्थ मुंबईचा संघ प्ले ऑफच्या रेसमध्ये असलेल्या संघासाठी धोकादायक ठरू शकतो. रोहित शर्माची सेना उद्या सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

कर्णधार रोहित (१९८ धावा) व इशान किशन (२७० धावा) ही सलामी जोडी फॉर्ममध्ये आलीय. ही मुंबईसाठी आनंदाची बाब आहे. तिलक वर्मा याने सर्वाधिक ३२८ धावा फटकावल्या आहेत. सूर्यकुमार यादव (३०३ धावा) यानेही मागील मोसमाचा चमकदार फॉर्म याही मोसमात कायम ठेवला आहे. कायरॉन पोलार्डचा सुमार कायम आहे. ही मुंबईसाठी डोकेदुखी ठरत आहे, पण टीम डेव्हिडने मागील दोन लढतींत मुंबईसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे मधल्या फळीत त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.

फलंदाजांकडून निराशा

लखनौकडून कोलकताचा शनिवारी ७५ धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या कोलकताच्या आशांना सुरुंग लागला. अय्यर (३३० धावा) व रसेल (२७२ धावा) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.

चौकडीकडून आशा

कोलकताचा गोलंदाजी विभाग चार खेळाडूंवर अवलंबून आहे. उमेश यादव (१५ बळी), आंद्रे रसेल (१२ बळी), टीम साऊथी (११ बळी), सुनील नारायण (८ बळी) या गोलंदाजांकडून पुन्हा एकदा या संघाला आशा असेल. इतर खेळाडूंची साथ त्यांना मिळायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : देशभरात थंडी वाढत असताना सोनं-चांदीच्या भावात मात्र गरमी! चांदी २.५ लाखांवर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

पुण्यात विद्यार्थिनीने चक्क शिक्षिकेलाच पाठवला 'I Love You' चा मेसेज; ब्लेडने हातावर कोरलं नाव, इमारतीवरून उडी मारण्याचीही दिली धमकी

हॅपी बर्थडे भाईजान! सलमान खानने गाठली साठी, पनवेलच्या फार्महाऊसवर जंगी पार्टी, एक्स गर्लफ्रेंडने केलं असं काही की...

बलात्कार प्रकरणात १० वर्ष शिक्षा! आता निर्दोष सुटकेसह सरकारी नोकरीही मिळाली, तेच जोडपं आता लग्नही करणार; सुप्रीम कोर्टात दुर्मिळ केस

BJP Sankalpnama Abhiyan : भाजपला हवा 'ग्राउंड लेव्हल फीडबॅक’, ‘संकल्पनामा अभियाना’मागची रणनीती काय?

SCROLL FOR NEXT