IPL Today Match KKR vs SRH SAKAL
IPL

कोलकतासाठी आरपारची लढाई, हैदराबादविरुद्ध आज सामना

चार पराभवांची कुऱ्हाड स्वतःच्याच पायावर चालवणाऱ्या सनरायझर्स हैदराबादसाठी आत्ता नाही तर कधीच नाही, अशी परिस्थिती

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2022: सलग पाच विजय मिळवल्यानंतर सलग चार पराभवांची कुऱ्हाड स्वतःच्याच पायावर चालवणाऱ्या सनरायझर्स हैदराबादसाठी आत्ता नाही तर कधीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज त्यांचा सामना त्यांच्याएवढेच गुण असलेल्या कोलकताविरुद्ध होत आहे. कोलकतासाठीही हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. (IPL Today Match KKR vs SRH)

केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादची कामगिरी ‘खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी’ अशाच प्रकारची राहिली आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभव, नंतर पाच विजय आणि आत्ता सलग चार पराभव. त्यामुळे स्वतःहून त्यांनी अडचणी निर्माण केल्या आहेत; पण आता प्लेऑफसाठी आव्हान कायम ठेवायचे असेल, तर विजयाशिवाय पर्याय नाही.

अगोदरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून जीवदान मिळालेल्या कोलकता संघावरची टांगती तलवार अजूनही कायम आहे. हैदराबादपेक्षा त्यांचा एक सामना अधिक झाला आहे. १२ सामन्यांतून १० गुण अशी त्यांची स्थिती आहे. त्यात निव्वळ सरासरीही (-०.०५७) अशी आहे. म्हणजेच केवळ विजय अनिवार्य आहेच, असे नाही, तर सरासरी उंचावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

एकापेक्षा एक चांगले खेळाडू असूनही कोलकताची गाडी रुळावर येत नव्हती. अचूक संघ निवडतानाच त्यांची गडबड होत होती. अखेर मुंबईविरुद्धच्या सामन्यात पाच बदल केले. १२ सामन्यांत अंतिम संघात २२ बदल करण्याचा विक्रम त्यांनी या वेळी केला. अखेर योग्य काँबिनेशन जुळल्याचे त्यांनी मुंबईवरील विजयातून सिद्ध केले; परंतु त्या सामन्यात तीन विकेट मिळवणारा पॅट कमिंस दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात आणखी एक बदल करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसेल.

व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे ही सलामीची जोडी पुन्हा एकत्र आली आहे. मुंबईविरुद्ध त्यांनी ६० धावांची सलामी दिली होती, तरीही कोलकताला १६५ धावाच करता आल्या होत्या. बुमराच्या पाच विकेटने त्यांचे कंबरडे मोडले होते. त्यातून कोलकताच्या फलंदाजांना बोध घ्यावा लागेल.

गोलंदाजीत सुधारणा हवी

हैदराबाद संघाला दुखापतींनी घेरले. वॉशिंग्टन सुंदरपाठोपाठ हुकमी टी. नटराजनला दुखापती झाल्या. त्याचबरोबर सर्वात वेगवान उमरान मलिकचा फॉर्म हरपला. त्यामुळे हैदराबादची गोलंदाजी एकदमच कमकुवत झाली आहे. गुजरातविरुद्ध त्यांचे गोलंदाज १९५ धावांचे संरक्षण करू शकले नव्हते, तर गेल्या तीन सामन्यांत चेन्नईविरुद्ध २०२, बंगळूरविरुद्ध १९२; तर दिल्लीविरुद्ध २०७ धावांची उधळण त्यांच्या गोलंदाजांनी केली. यावरून हैदराबादला गोलंदाजीत फार मोठी सुधारणा करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT