IPL Winner Gujarat Titans Comment On UEFA Champions League Winner Real Madrid Tweet  ESAKAL
IPL

Champions League विजेत्या माद्रिदचे ट्विट, IPL जिंकणाऱ्या गुजरातची कमेंट

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2022 : भारतात नुकतीच क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी टी 20 लीग आयपीएलची फायनल पार पडली. तर युरोपात UEFA चॅम्पियन्स लीगची देखील फायनल झाली. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थान रॉयल्सला नमवत आयपीएलवर (IPL 2022) आपले नाव कोरले. तर चॅम्पियन्स लीगमध्ये रिअल माद्रिदने (Real Madrid) लिव्हरपूलला मात देत चॅम्पियन्स जिंकली.

क्रिकेट आणि फुटबॉलच्या चाहत्यांसाठी गेला आठवडा हा रोमांचक राहिला आहे. 29 मे ला रिअल माद्रिदने तब्बल 14 व्यांदा चॅम्पियन्स लीग (UEFA Champions League) जिंकली. दरम्यान, या विजयानंतर एक खास ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिअल माद्रिदच्या ट्विटरवरून एक ट्विट करण्यात आले आहे त्यात लिहिले आहे की, 'आम्ही फक्त फायनल खेळत नाही तर जिंकतो देखील.'

रिअल माद्रिदच्या या ट्विटवर गुजरात टायटन्सने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. यावर गुजरात टायटन्सने कमेंट केली की, 'त्यांनी काय म्हटलं होत...'

सोशल मीडियावर सध्या हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट राखून पराभव करत पहिल्याच हंगामात पहिले विजेतेपद पटकावले. आयपीएलच्या फायनल सामन्यात हर्दिक पांड्याने भेदक मारा करत 17 धावात 3 विकेट घेतल्या तर 34 धावांची महत्वपूर्ण खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिली होते. पांड्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

पहिल्याच हंगामात विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर गुजरात टायटन्सने अहमदाबादमध्ये रोड शो देखील केला होता. या रोड शोवेळी गुजरात टायटन्सच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT