ipl sakal
IPL

IPL : यशस्वी जयस्वालची विक्रमी खेळी

राजस्थानचा दिमाखदार विजय; कोलकत्याच्या आशांवर पाणी

सकाळ डिजिटल टीम

कोलकता - यशस्वी जयस्वालच्या नाबाद ९८ धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुरुवारी कोलकता नाईट रायडर्सचा ९ विकेट व ४१ चेंडू राखून धुव्वा उडवला. राजस्थान रॉयल्सने सहाव्या विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर धडक मारली. या विजयासह राजस्थान रॉयल्सने प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल केली. कोलकता नाईट रायडर्सच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले. त्यांना सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, याआधी राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्टने जेसन रॉय (१० धावा) व रहमानुल्लाह गुरबाज (१८ धावा) या दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवत कोलकत्याला बॅकफूटवर फेकले. यानंतर व्यंकटेश अय्यर व नितीश राणा या जोडीने कोलकताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

राजस्थानसाठी युझवेंद्र चहल याने या लढतीत प्रभावी कामगिरी केली. त्याने सुरुवातीला नितीश याला २२ धावांवर बाद करीत अय्यर व त्याची जोडी तोडली. अय्यरसोबत आंद्रे रस्सेल महत्त्वाची भागीदारी करील असे वाटत होते. पण के.आसिफच्या गोलंदाजीवर रस्सेल १० धावांवर बाद झाला. अय्यरने एका बाजूने दमदार फलंदाजी कायम ठेवली. त्याने ४२ चेंडूंमध्ये २ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावांची खेळी साकारली. पण पुन्हा एकदा चहल त्यांच्यासाठी धावून आला. चहलच्या गोलंदाजीवर अय्यर बोल्टकरवी झेलबाद झाला.

चहलने यानंतर फॉर्ममध्ये असलेला रिंकू सिंग (१६ धावा) व पुनरागमन करणारा शार्दुल ठाकूर (१ धाव) यांना तंबूत पाठवले. कोलकता संघाने २० षटकांत ८ बाद १४९ धावा फटकावल्या. चहलने २५ धावा देत चार फलंदाजांना बाद केले. आयपीएलमध्ये सर्वाधिक फलंदाज बाद करण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे. जयस्वाल शतकाजवळ पोहचल्यावर त्याचा सहकारी आणि कर्णधार संजू सॅमसनने त्याला शतकपूर्ण करण्यासाठी स्ट्राईक दिला, परंतु यशस्वी जयस्वालने स्वतःच्या शतकापेक्षा संघाच्या मोठ्या विजयाला प्राधान्य दिले.

संक्षिप्त धावफलक

कोलकता नाईट रायडर्स २० षटकांत ८ बाद १४९ धावा (व्यंकटेश अय्यर ५७, नितीश राणा २२, युझवेंद्र चहल ४/२५, ट्रेंट बोल्ट २/१५) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स १३.१ षटकांत १ बाद १५१ धावा (यशस्वी जयस्वाल नाबाद ९८ - ४७ चेंडू, १२ चौकार, ५ षटकार, संजू सॅमसन

नाबाद ४८).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT