prithvi shaw Sakal
IPL

IPL 2022 : 'पृथ्वी'ला फिटनेसचं ग्रहण; तरीही तो नो टेन्शन कारण...

दिल्ली संघाला आयपीएलच्या सामन्यापुर्वी बसु शकतो मोठा धक्का

सकाळ वृत्तसेवा

IPL 2022: आयपीएलचा 15 वा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. सर्वच खेळाडू आयपीएलच्या सामन्यांसाठी आता आपल्या संघाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. युवा फलंदाज पृथ्वी शॉ हा देखील दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये सामील झालाय. दिल्ली कॅपिटल्सनं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन पृथ्वी संघाला जॉईन झाल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. तो मोठ्या रुबाबत दिसत असला तरी तो काही सामन्याला मुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. पण आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सला मात्र या गोष्टीची फार चिंता असेल, असे दिसत नाही.

बीसीसीआयने आयपीएल पूर्वी काही खेळाडूंसाठी फिटनेस कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पमध्ये बीसीसीआयने 25 खेळाडूंना उपस्थित राहण्यास सांगितले होते. यात आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉच्या नावाचा समावेशही होता. बंगळुरुस्थित एनसीए (NCA) कॅम्पमध्ये खेळाडूंची फिटनेस चाचणी झाली. यात पृथ्वी फेल झाल्याचे समजते. त्यामुळे आयपीएलच्या सामन्यात त्याला सुरुवातीपासून खेळवणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. बीसीसीआय पृथ्वीला आयपीएल खेळू देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या सुत्राच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, फिटनेस चाचणीत तो फेल झाला असला तरी याचा आयपीएल फ्रेंचायझी संघावर कोणताही परिणाम होणार नाही. बीसीसीआय त्याला आयपीएल खेळण्यापासून रोखू शकत नाही. हा एक फिटनेसचा निकाल आहे खेळाचा शेवट नाही. पृथ्वी शॉने सलग तीन रणजी सामने खेळले आहेत, असेही अधिकाऱ्याने म्हटले आहे. बंगळुरुस्थित NCA मध्ये जी चाचणी झाली ती टीम इंडियाच्या आगामी दौऱ्याच्या अनुषंगाने होती. त्यामुळे पृथ्वीच च दिल्लीच्या डावाला सुरुवात करण्याची अपेक्षा आहे. पृथ्वी शॉ इतर खेळाडूं सारखा फिट नाही याच कारणामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. पृथ्वीच्या जागी मयंक अग्रवालला भारतीय संघात स्थान दिले होते. आता पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करण्याची त्याची संधी हुकणार असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT