Hardik Pandya| Akash Madhwal | Rohit Sharma | IPL Viral Video Sakal
IPL

PBKS vs MI: कॅप्टन हार्दिककडे दुर्लक्ष करत मधवालने घेतला रोहितचा सल्ला? Video होतोय व्हायरल

IPL, Viral Video: आयपीएल 2024 मध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला शेवटच्या षटकात मात दिली. दरम्यान, याच सामन्यातील मधवाल, रोहित आणि हार्दिक यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Hardik Pandya Viral Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात गुरुवारी (18 एप्रिल) मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सविरुद्ध 9 धावांनी विजय मिळवला. हा मुंबईचा तिसराच विजय ठरला. दरम्यान मुल्लनपूरला झालेल्या या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या सामन्यात मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला शेवटच्या षटकात 12 धावांची गरज होती आणि मुंबईला एका विकेटची गरज होती. हे षटक मुंबईकडून आकाश मधवाल टाकणार होता.

त्याआधी त्याची मुंबईचे आजी-माजी कर्णधार हार्दिक आणि रोहितशी चर्चा झाली. यादरम्यानचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत काही युजर्सने अंदाज लावला आहे की मधवालने हार्दिककडे पूर्णपणे दुर्लक्ष करत रोहित शर्माशी चर्चा केली. तसेच त्याच्याकडून सल्ला घेतला.

या व्हिडिओमध्ये दिसते की मधवाल रोहितशी बोलता बोलता त्याच्या जवळ येत आहे, यावेळी तिथे हार्दिकही येतो. पण मधवाल रोहितशीच क्षेत्ररक्षणाबाबत बोलताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेक युजर्सने हार्दिककडे मधवालने दुर्लक्ष केल्याचा दावा केला आहे. तथापि, हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ असून सकाळ त्याची पुष्टी करत नाही.

दरम्यान, मधवालने या षटकातील पहिला चेंडू वाईड टाकला होता. त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात कागिसो रबाडा धावबाद झाला. त्यामुळे पंजाब किंग्सचा डाव 19.1 षटकात 183 धावांवरच संपुष्टात आला.

पंजाबकडून अशुतोष शर्माने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली, तसेच शशांक शर्माने 41 धावा केल्या. मुंबईकडून गोलंदाजीत जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 78 धावांची खेळी केली होती, त्यामुळे मुंबईने 20 षटकात 7 बाद 192 धावा केल्या. पंजाब किंग्सकडून हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT