Ishan Kishan Says Auction hefty amount was in my mind
Ishan Kishan Says Auction hefty amount was in my mind esakal
IPL

किशन म्हणतो माझ्या डोक्यात 15.25 कोटी रूपये होते पण...

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : आयपीएलच्या 2022 च्या हंगामात (IPL 2022) मुंबई इंडियन्सच्या इशान किशनवर (Ishan Kishan) सर्वाधिक 15.25 कोटी रूपयांची बोली लागली. या बोलीनंतर इशान किशनची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र 15 व्या हंगामात इशान किशनला फारशी चमक दाखवता आली नाही. आतापर्यंत त्याने 321 धावाच केल्या आहेत. याबाबत बोलताना इशान किशनने मान्य केले की त्याच्या डोक्यात सतत 15.25 कोटी रूपयांची बोली (Auction Amount) घोळत होती. मात्र भारतीय संघातील त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी त्याला याबाबत विचार न करण्याचा सल्ला दिला.

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात उद्या ( दि. 12 ) हाय व्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी इशान किशनने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'लिलावात मोठी रक्कम मिळाल्याचा दबाव माझ्यावर काही दिवस होता. याची जाणीव झाल्यानंतर मी वरिष्ठ खेळाडूंशी याबाबत चर्चा केली आणि त्याचा मला फायदा झाला.' किशन पुढे म्हणाला की, 'अनेक वरिष्ठ खेळाडू जसे की रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी मला मोठ्या रक्कमेबाबत विचार न करण्याचा सल्ला दिला. कारण मी काही ही रक्कम मागितली नव्हती. कोणालातरी माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच एवढी मोठी बोली लावली. मोठ्या रक्कमेबाबत विचार करण्याऐवजी मी माझ्या खेळात सुधारणा कशी करता येईल याचा विचार करायला हवा. वरिष्ठांशी बोलल्यानंतर मला त्याचा फायदा झाला कारण हे सर्वजण या स्थितीतून गेले आहेत.'

इशान किशनने सांगितले की, रोहित शर्मा आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मला माझा नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला. संघात प्रत्येकाची एक भुमिका आहे. माझी भुमिका ही संघाला चांगली सुरूवात करून देणे ही आहे. जर मी क्रीजवर टिकून राहिलो तर मला 30, 40 धावांवर बाद होण्यापासून वाचलं पाहिजे. मला या चांगल्या सुरूवातीचे रूपांतर मोठ्या धावांमध्ये करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajkot TRP Game Zone Fire: सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन 'डेथ झोन' कसा बनला? 2 एकरमध्ये पसरलेले, 20 हून अधिक खेळले जायचे

Railway News: मध्य रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक; ६९ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द!

Cyclone Remal: 'रेमल' घेऊन येत आहे विनाश! जाणून घ्या कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल, मुसळधार पाऊस अन् वादळाचा इशारा...

Eng vs Pak : आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडपुढेही पाकिस्तान नतमस्तक; बटलरच्या संघाने बाबरच्या टीमला आणले रडकुंडी

T20 World Cup 2024 : कोहली-पांड्या टीम इंडियासोबत का गेले नाहीत अमेरिकेला? मोठे कारण आले समोर

SCROLL FOR NEXT