Punjab Kings vs Mumbai Indians esakal
IPL

PBKS vs MI : इशांत - सूर्याचा धडाका, पंजाबच्या होमग्राऊंडवर मुंबईचाच भांगडा

अनिरुद्ध संकपाळ

Punjab Kings vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने इशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या दमदार 116 धावांच्या भागीदारीच्या जोरावर पंजाब किंग्जचे 215 धावांचे आव्हान 18.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदाल्यात पर करत सामना 6 विकेट्सनी खिशात टाकला. मुंंबईकडून इशान किशनने 75 धावांची तर सूर्यकुमार यादवने 66 धावांची खेळी केली. तिलक वर्माने 10 चेंडूत 29 धावा चोपून सामना षटकाराने संपवले. या विजयाबरोबरच मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत 10 गुणांसह सहावे स्थान पटकावले.

पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सविरूद्ध विजयासाठी 215 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात ऋषी धवनने रोहित शर्माला शुन्यावर बाद केले. यानंतर कॅमरून ग्रीन आणि इशान किशन यांना डाव सावरत मुंबईला पॉवर प्लेमध्ये अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र नॅथन एलिसने ग्रीनला 23 धावांवर बाद केले.

मुंबईच्या 54 धावा झाल्या असताना ग्रीन बाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. या दोघांनी आक्रमक अर्धशतके ठोकत मुंबईचे दीडशतक 14 व्या षटकात धावफलकावर लावले. सूर्या - किशनने शतकी भागीदारी रचली. ही भागीदारी 116 धावांपर्यंत नेत या दोघांनी मुंबईला 15 षटकात 170 धावांपर्यत पोहचवले.

आता सामना मुंबईच्या आवाक्यात आला होता. मात्र एलिसने सूर्यकुमारला 66 धावांवर तर अर्शदीप सिंगने इशान किशनला 75 धावांवर बाद करत मुंबईचे टेन्शन वाढवले. परंतु टीम डेव्हिड आणि तिलक वर्माने नाबाद 38 धावांची भागीदारी रचत मुंबईचा विजय 19 व्या षटकातच साकरला. वर्माने 10 चेंडूत 26 तर डेव्हिडने 10 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या.

तत्पूर्वी, पंजाब किंग्जने मुंबईविरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 3 बाद 214 धावा ठोकत मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पंजाबकडून लिम लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याला जितेश शर्माने नाबाद 49 धावा करून चांगली साथ दिली. मुंबईकडून पियुष चावलाने 2 तर अर्शद खानने एक विकेट घेतली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT