IPL 2023 LIVE Streaming Jio Cinema ESAKAL
IPL

Jio Cinema : फ्री IPL दाखवली आता जिओ सिनेमाचे सबस्क्रिप्शन प्लॅन्स झाले लीक! दोन रूपयांपासून होणार सुरूवात

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 LIVE Streaming Jio Cinema Subscription Plans : जिओ सिनेमा अॅपला आयपीएलदरम्यान छप्पर फाड के प्रतिसाद मिळत आहे. सध्या फ्री असलेल्या जिओ सिनेमाना आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनवर काम करत असल्याची माहिती मिळत आहे. जिओ सिनेमाने फिफा वर्ल्डकप 2022 चे देखील लाईव्ह स्ट्रिमिंग केले होते. त्यांना आयपीएलचे मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग करत आहे.

आता जिओ डिस्ने हॉटस्टार सारखा एक पे-वॉल आणण्याच्या तयारीत आहे. मात्र ही पे-वॉल सध्याचा प्रेक्षक कायम ठेवता येईल अशा प्रकारे डिझाईन केली आहे. यासाठी जिओ स्टुडियओ जवळपास 3000 कोटी रूपये गुंतवणार आहे. याचे प्लॅन्स 2 रूपयांपासून सुरू होणार आहेत.

जिओ सिनेमाचे प्रस्तावित प्लॅन्स :

दोन उपकरणांवर दिवसाला 29 रूपये

गोल्ड प्लॅन : दोन उपकरणांवर तीन महिन्यांसाटी 299 रूपये

प्लॅटिनम प्लॅन : चार उपकरांवर एका वर्षासाठी 599 रूपये

आयपीएल 2023 च्या 28 मे रोजी होणाऱ्या फायनलपूर्वी जिओ सिनेमा आपले नवीन प्लॅन्स आणि त्यांच्या किंमती जाहीर करतील. व्हायकॉम 18 मीडिया आणि कंटेट बिजनेस अध्यक्ष ज्योती देशपांडे यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितले. मात्र नवीन प्लॅनच्या किंमती या आयपीएल 2023 च्या सामन्यांसाठी नसतील. त्याचा कोणताही परिणाम हा मोफत आयपीएल पाहण्यावर होणार नाहीये.

जिओ सिनेमा आपल्या प्रतिस्पर्धी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या तुलनेत सामन्य दरात सबस्क्रिप्शन देणार आहे. डिजने हॉटस्टार एका महिन्यासाठी 299 रूपये आकारते. तर जिओ सिनेमा 99 रूपये प्रती महिना इथून वर्षाला 499 रूपेय असे तीन प्लॅन्स ऑफर करणार आहेत. दिवसाला 2 रूपयाचा देखील जिओ प्लॅन आणणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT