Jos Buttler RR vs KKR News Marathi sakal
IPL

Jos Buttler RR vs KKR : शतकात अन् राजस्थानच्या विजयात धोनी अन् कोहलीही वाटेकरी… सामन्यानंतर बटलर हे काय म्हणाला?

जॉस द बॉस...! असे इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलरला म्हटले जाते हे सर्वांना माहित आहे. पण असे का म्हणतात याचे उत्तर पुन्हा एकदा 16 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात पाहायला मिळाले.

Kiran Mahanavar

Jos Buttler RR vs KKR : जॉस द बॉस...! असे इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलरला म्हटले जाते हे सर्वांना माहित आहे. पण असे का म्हणतात याचे उत्तर पुन्हा एकदा 16 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात पाहायला मिळाले. कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सुनील नरेनच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर कोलकाताने 6 गडी गमावत 223 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना 16 षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या 6 बाद 162 धावा होती. 24 चेंडूत 62 धावा हव्या होत्या. विजय अवघड वाटत होता पण जोस बटलरने शेवटच्या षटकापर्यंत तग धरून संघाला सामन्यात विजय मिळवून दिला.

जोस बटलरने 60 चेंडूत 107 धावांची करिष्माई खेळी खेळली. महत्वाची गोष्ट म्हणजे फलंदाजी करताना त्याच्या पायात काही समस्या निर्माण झाल्या होत्या आणि त्याला नीट चालताही येत नव्हते. पण बटलरने हिंमत हारली नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवला. सामन्यानंतर त्याने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्येही आपल्या शब्दांनी चाहत्यांची मने जिंकली.

जोस बटलर म्हणाला की, “आजच्या इनिंगचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे आत्मविश्वास, काहीवेळा असे वाटले की मी लयसाठी थोडा संघर्ष करत आहे. खरं तर मी गोल्फ बघत होतो आणि मला मॅक्स होम्स नावाचा माणूस दिसला. जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा मी अगदी उलट विचार करतो आणि स्वप्न पाहण्याची हिंमत करतो. हा विचार मला पुढे जाण्याची प्रेरणा देत राहतो.

पुढे तो म्हणाला की, कधी कधी तुम्हाला निराश वाटते किंवा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारत आहात. पण मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होतो की सर्व काही ठीक आहे, चालत राहा, तुला तुझी लय परत मिळेल आणि शांत राहण्याचा प्रयत्न कर.

एवढेच नाही तर जोश बटलरने विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख करताना म्हणाला की, संपूर्ण आयपीएलमध्ये तुम्ही अनेकदा विचित्र गोष्टी घडताना पाहिल्या असतील. धोनी आणि कोहली सारखे खेळाडू ज्या प्रकारे ते शेवटपर्यंत टिकून राहतात आणि विश्वास ठेवतात, ते तुम्ही आयपीएलमध्ये अनेकदा पाहिले आहे आणि मीही तेच करण्याचा प्रयत्न करत होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : पुण्यातील ड्रग्स तस्करने घरातच उभारली प्रयोगशाळा

SCROLL FOR NEXT